जितेंद्र जोशी बनणार चोर!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    19-Dec-2019
Total Views |

jitu_1  H x W:



प्रियदर्शन जाधव लिखित आणि दिग्दर्शित 'चोरीचा मामला' हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात अभिनेता जितेंद्र जोशी नंदन नावाच्या एका अतरंगी चोराच्या भूमिकेत दिसणार आहे. नुकताच पोस्टर आणि टीझरच्या माध्यमातून अभिनेता जितेंद्र जोशीचा हा लुक शेअर करण्यात आला.







या चित्रपटात जितेंद्र जोशीसह आणखी काही कलाकार दिसणार आहेत. मात्र या सर्वांची नावे अद्याप गुलदस्त्यात आहेत. या सर्वांचे लूक टप्प्याटप्प्याने समोर येणार आहेत. 'मस्का' या चित्रपटानंतर प्रियदर्शन जाधवचा दिग्दर्शक म्हणून 'चोरीचा मामला' हा दुसरा चित्रपट असणार आहे.


एव्हरेस्ट एंटरटेन्मेंट प्रस्तुत आणि स्वरुप स्टुडिओजच्या सहकार्याने सुधाकर ओमळे
, आकाश पेंढारकर, सचिन नारकर, विकास पवार, स्मिता ओमळे यांनी सिनेमाची निर्मिती केली आहे. लेखन आणि दिग्दर्शनाची बाजू प्रियदर्शनने सांभाळली असून चिनार महेश यांनी संगीत दिग्दर्शन केले आहे. ३१ जानेवारीला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

@@AUTHORINFO_V1@@