नागरिकत्व दुरुस्ती कायद्या समर्थनार्थ झालेल्या एकत्रीकरणाला अभाविपचे समर्थन

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    19-Dec-2019
Total Views |


asf_1  H x W: 0

 


मुंबई नागरिकता सुधारणा विधेयकाच्या समर्थनार्थ गुरुवारी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे झालेल्या एकत्रीकरणाला अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने समर्थन दिले. या कायद्याविरुद्ध संपूर्ण देशभर सुरू असलेल्या हिंसेच्या विरोधात आणि नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या समर्थनार्थ गुरुवारी यंकाळी शेकडोंच्या संख्येने तरुण विद्यार्थी आणि नागरिक एकत्र आले होते. थोर स्वातंत्र्यसेनानी सुभाषचंद्र बोस यांचे नातू अर्धेंदु बोस हे देखील या कायद्याच्या समर्थनार्थ यावेळी उपस्थित होते.

 

या कायद्याविरोधात गैरसमज पसरवून देशामधील वातावरण दूषित करण्यात काही वाईट शक्तींचा हात आहे. त्यांचे षड्यंत्र मोडून काढण्यासाठी युवकांनी आणि देशभक्त नागरिकांनी आता रस्त्यावर उतरणे आवश्यक होते. मुंबईसारख्या ठिकाणी एवढ्या मोठ्या प्रमाणात समर्थनार्थ एकत्र येणे ही एक सुरुवात आहे आणि अभाविप याचे समर्थन करते, तसेच पुढाकार घेऊन यशस्वीरित्या या आंदोलनाचे आयोजन करणाऱ्या आयोजकांचे अभिनंदन करते, असे अभाविपचे कोंकण प्रदेश मंत्री अनिकेत ओव्हाळ यांनी म्हटले.

 

विरोधापेक्षा समर्थन करणाऱ्यांची संख्या जास्त आहे, परंतु ते दाखविणे आता आवश्यक झाले आहे. अभाविप मार्फत देशभरात अनेक ठिकाणी, अनेक विद्यापीठांत नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या समर्थनार्थ कार्यक्रमांची सुरवात झाली आहे. कुठल्याही समाजाच्या विरोधात हे बिल नसून समाजामध्ये विष पसरवणाऱ्या वाईट ताकदींपासून समाजाचे रक्षण करण्याची जबाबदारी आता सर्व जागरूक आणि देशभक्त तरुणांची आहे असे देखील ते यावेळी म्हणाले.

@@AUTHORINFO_V1@@