आता चित्रपटातही रंगणार भारत-पाक सामना

    18-Dec-2019
Total Views |

varun_1  H x W:


भारत आणि पाकिस्तान हे दोन देश आतापर्यंत खेळाच्या मैदानात आणि राजकारणात एकामेकांच्या समोर आले. पण आता यांचा सामना नृत्यांच्या मंचावर देखील घडणार आह. अभिनेता वरूण धवन आणि अभिनेत्री श्रद्धा कपूर स्टारर 'स्ट्रीट डान्सर ३डी' चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांना भारत आणि पाकिस्तानमधील नृत्याची जुगलबंदी अनुभवता येणार आहे.

 

अभिनेता वरुण धवन आणि अभिनेत्री श्रद्धा कपूर यांची मुख्य भूमिका असलेल्या या चित्रपटात वरूण भारतीय डान्सर तर श्रद्धा पाकिस्तानच्या डान्सरची भूमिका साकारताना दिसत आहे. बुधवारी या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला. या उत्कंठावर्धक ट्रेलरमुळे प्रेक्षकांच्या चित्रपटा बद्दलच्या अपेक्षा वाढल्या आहेत. ‘स्ट्रीट डान्सर’हा चित्रपट रेमो डिसुजाच्या ‘एबीसीडी’ या चित्रपटाच्या मालिकेतला तिसरा भाग आहे. या चित्रपटात वरुण-श्रद्धासह प्रभुदेवाही महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. पहिल्या दोन चित्रपटातील कलाकारही या चित्रपटात झळकणार आहेत.




सध्या आलेल्या रिमेकच्या ट्रेंडला अनुसरून या चित्रपटातही जुन्या गाण्यांचा रिमेक करण्यात आला आहे. प्रभूदेवाचे लोकप्रिय गाणे ‘मुकाबला’ आणि पंडित भीमसेन जोशींचे ‘मिले सूर मेरा तुम्हारा’ ही गाणी नवीन अंदाजात प्रेक्षकांना ऐकायला मिळणार आहेत. येत्या २४ जानेवारीला हा चित्रपट सर्वत्र प्रदर्शित होणार आहे.