विक्रमवीर रो'हिटमॅन' शर्माने मोडले अनेक रेकॉर्ड

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    18-Dec-2019
Total Views |


saf_1  H x W: 0


विशाखापट्टणम : भारत आणि वेस्ट इंडीज संघात तीन सामन्यांच्या मालिकेतील दुसरा एकदिवसीय सामना विशाखापट्टणमच्या मैदानात खेळण्यात येत आहे. यामध्ये वेस्ट इंडिजने नाणेफेकजिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय भारतीय फलंदाजांची उपयुक्त ठरला. भारताची सलामीवीर जोडी रोहित शर्मा आणि के.एल राहुलने २२७ धावांची भागीदारी करत अनेक रेकॉर्ड मोडीत काढले.

 

रोहितने केले २८वे शतक साजरे, मोडले हे रेकॉर्ड

 

> एकदिवसीय सामन्यांमध्ये सर्वाधिक शतक करणारा तो भारताचा तिसरा आणि जगातील चौथा फलंदाज ठरला, श्रीलंकेच्या सनथ जयसूर्याच्या २८ शतकांची केली बरोबरी

 

> वेस्ट इंडिजविरुद्ध एकदिवसीय सामन्यांमध्ये सर्वाधिक सर्वाधिक षटकार ठोकणाऱ्या यादीत धोनी, विराटला टाकले मागे. रोहितने २९ षटकार ठोकले तर धोनीच्या नावावर २७ आणि विराट कोहलीच्या नावावर आतापर्यंत २५ षटकार जमा आहेत.

 

> एका कॅलेंडर वर्षात एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतके झळकावणाऱ्या फलंदाजांच्या यादीत रोहितने सौरव गांगुली आणि डेव्हिड वॉर्नर यांच्याशी बरोबरी केली आहे. २०१९ वर्षातलं रोहितचं वन-डे क्रिकेटमधलं हे सातवं शतक ठरलं आहे.

 

> सलग सातव्या वर्षी भारताकडून सर्वोच्च एकदिवसीय धावसंख्या करण्याचा विक्रम कायम राखला. रोहित २०१३ पासून ते २०१८ पर्यंत सलग सहा वर्षे भारताकडून एकदिवसीय क्रिकेटमधील सर्वोच्च धावसंख्या करणारा ठरला होता.

@@AUTHORINFO_V1@@