भारताने रचला धावांचा डोंगर ; विंडीजसमोर ३८८ धावांचे लक्ष्य

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    18-Dec-2019
Total Views |


asf_1  H x W: 0


विशाखापट्टणम : भारत आणि वेस्ट इंडिजच्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यामध्ये वेस्ट इंडिजने नाणेफेक जिंकत प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. याचा फायदा भारतीय फलंदाजांनी पुरेपूर उचलला. भारताची सलामी जोडी रोहित शर्मा आणि के.एल.राहुल यांनी द्विशतकी भागीदारी केली. पहिल्या विकेटसाठी त्यांनी २२७ धावांची भागीदारी रचली. त्यांच्यानंतर आलेल्या श्रेयस अय्यर आणि ऋषभ पंतची ताबडतोड खेळी याच्या जोरावर भारताने विंडीज समोर धावांचा डोंगर उभारला. भारताने निर्धारीत ५० षटकात ५ बाद ३८७ धावा केल्या आहेत.

 

भारतीय सलामीवीर जोडी रोहित आणि राहुल यांनी ३६ षटकात २२७ धावांची सलामी दिली. केएल राहुल १०४ चेंडूत ८ चौकार आणि ३ षटकारासह १०२ धावांवर बाद झाला. यानंतर तिसऱ्या क्रमाकांवर आलेला भारतीय कर्णधार विराट कोहली पुन्हा एकदा 'फेल' ठरला. त्याला भोपळाही फोडता आला नाही. एका बाजू पकडून रोहित शर्माने आक्रमक खेळी कायम ठेवली. त्याने श्रेयश अय्यर सोबत झटपट अर्धशतकी भागिदारी केली. रोहित १३८ चेंडूत १७ चौकार आणि ५ षटकारांच्या मदतीने १५९ धावा करून बाद झाला. पुढे पंतने १६ चेंडूत ३ चौकार आणि ४ षटकारांसह ३९ धावांची खेळी केली. पंत बाद झाल्यानंतर अय्यरही ३२ चेंडूत ५३ धावांवर बाद झाला.

@@AUTHORINFO_V1@@