आयपीएल लिलावासाठी मुंबईकडे सर्वात कमी पैसे...

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    18-Dec-2019
Total Views |


asf_1  H x W: 0


नवी दिल्ली : आयपीएल २०२०च्या रणसंग्रामाला लवकरच सुरुवात होणार आहे. १९ डिसेंबरला आयपीएल २०२०साठी लिलावप्रक्रिया पार पडणार आहे. यामध्ये ३३२ खेळाडूंवर बोली लावण्यात येणार आहे. विशेष म्हणजे, गेल्या वर्षी २०१९मध्ये मुंबई इंडियन्सने चेन्नई सुपर किंग्जवर ठरतक विजय मिळवत आयपीएलचे विजेतेपद पटकावले होते. मात्र, यावर्षी मुंबई इंडियन्स संघाकडे या लिलावासाठी सर्वात कमी पैसे शिल्लक आहेत.

 

आयपीएल २०२०च्या लिलावामध्ये मुंबई इंडियन्स संघाकडे १३.०५ कोटी शिल्लक आहेत. यामध्ये त्यांना फक्त ७ खेळाडू विकत घेता येऊ शकणार आहेत, ज्यामध्ये २ परदेशी खेळाडू असणे अनिवार्य आहे. मुंबईच्या संघाने काही दिवसांपूर्वीच ट्रेंट बोल्टचा समावेश करून घेतला होता. तसेच, त्यांनी १५ खेळाडूंना आपल्याकडे ठेवले आहे. तसेच, किंग्ज इलेव्हन पंजाबकडे लिलावात बोली लावण्यासाठी सर्वाधिक पैसे आहेत. त्यांच्याकडे ४२.७० कोटी रुपये असून ९ खेळाडू विकत घेऊ शकतात, ज्यामध्ये ४ परदेशी खेळाडूंचा समावेश असणे गरजेचे आहे.

 

कोणाकडे किती पैसे जाणून घ्या...

 
 
 संघ रक्कम शिल्लक शिल्लक खेळाडूंचा कोटा
 चेन्नई १४.६० कोटी ५ (२ परदेशी)
 दिल्ली २७.८५ कोटी ११ (५ परदेशी)
 पंजाब ४२.७० कोटी ९ (४ परदेशी)
 कोलकाता ३५.६५ कोटी ११ (४ परदेशी)
 मुंबई १३.०५ कोटी ७ (२ परदेशी)
 राजस्थान २८.९० कोटी ११ (४ परदेशी)
 बंगळुरू २७.९० कोटी १२ (६ परदेशी)
 हैदराबाद १७ कोटी ७ (२ परदेशी)
 
@@AUTHORINFO_V1@@