'नागरिकत्व' कायद्याविरोधात ट्विट फरानला भोवणार ?

    18-Dec-2019
Total Views |
Sunil Mittal _1 &nbs
 

कलम १२१चे उल्लंघन झाल्याचा आरोप


मुंबई : बॉलीवूड कलाकारांकडून नागरिकत्व दुरुस्ती विधेयकाला विरोध होत आहे, नागरिकत्व दुरुस्ती विधेयकाविरोधात आयुषमान खुराना, राजकुमार राव, परिणिती चोप्रा, आलीया भट्ट आणि अनुराग कश्यप आदी कलाकारांनी या विधेयकाला विरोध केला आहे. फरान अख्तरनेही या विधेयकाला विरोध केला, मात्र त्याला पोलीसांच्या कारवाईला सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे.



 

फरान अख्तरने सर्व आंदोलकांना ऑगस्ट क्रांती मैदानात १९ डिसेंबर रोजी केल्या जाणाऱ्या निदर्शनासाठी येण्याचे आवाहन केले. केवळ सोशल मीडियावर आंदोलन केल्याने काहीही होणार नाही, असेही तो म्हणाला. मात्र, त्याच्या या ट्विटनंतर आयपीएस अधिकारी संदीप मित्तल यांनी कारवाईची मागणी केली आहे. कलम १२१ समजवणारा एक व्हीडीओही पोस्ट केला आहे. तुम्ही हा गुन्हा अजाणतेपणी केलेला नाही. मुंबई पोलीस आणि एनआयए हे पाहत आहे. राष्ट्राने तुम्हाला सर्वकाही दिले आहे असे सांगत त्या व्हीडिओची लिंक याद्वारे पाठवली आहे.

 

फरान अख्तरचे वडिल जावेद अख्तर यांच्या ट्विटवरही मित्तल यांनी टीप्पणी केली होती. 'लॉ ऑफ लॅण्ड' कायद्यानुसार, पोलीस कुठल्याही विद्यापीठात घुसखोरी करू शकत नाही, असे सांगितले होते. त्यावर मित्तल यांनी प्रतिक्रीया देत म्हटले की,'प्रिय कायदेतज्ज्ञ कृपया लॉ ऑफ लॅण्ड कायद्याचा अनुच्छेद आणि अधिनियम आम्हालाही सांगावा. थोडी विस्तृत माहिती मला द्यावी, म्हणजे कळेल नेमका कायदा कसा आहे.