छोट्या पडद्यावरचा ‘हा’ लाडका खलनायक दिसणार रोमँटिक भूमिकेत

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    18-Dec-2019   
Total Views |

kiran_1  H x W:

मालिका संपली तरी आजही त्याची लोकप्रियता तसूभरही कमी झालेली नाही. आजही छोट्यापडद्यावरचं ‘भैय्यासाहेब’ हे पात्र प्रेक्षकांच्या मनात घर करून आहे. मालिका विश्वातल्या या लोकप्रिय खलनायकाला आपल्या अभिनयाने जिवंत करणाऱ्या किरण गायकवाडला प्रेक्षक आजही मिस करतात. त्याला पुन्हा पडद्यावर पाहण्यासाठी आता जास्तकाळ वाट पहावी लागणार नाहीय... 


झी मराठीवरील लोकप्रिय मालिका ‘लागिरं झालं जी’मध्ये खलनायक साकारणारा अभिनेता किरण गायकवाड लवकरच एका चित्रपटात रोमँटिक भूमिका साकारताना दिसणार आहे. चित्रपटाची कथा, नाव आणि कलाकार मात्र अद्याप गुलदस्त्यात असून लवकरच हेही गुपित लवकरच उघड होणार आहे. येत्या नवीन वर्षात किरणचे तीन चित्रपट प्रदर्शित होत असल्याने, त्याला तीन वेगवेगळ्या भूमिकांमध्ये मोठ्या पडद्यावर बघण ही चाहत्यांसाठी पर्वणीच असणार आहे.



चित्रपटांकडे लक्ष केंद्रित करायचं आहे : किरण गायकवाड

‘लागिरं...’ नंतर बऱ्याच मालिकांच्या ऑफर मला आल्या. परंतु त्यातल्या अर्ध्यापेक्षा जास्त भूमिका खलनायकाच्या होत्या. ‘भैय्यासाहेब’ साकारल्यानंतर लगेच पुन्हा त्याच पद्धतीची भूमिका करावी का असा प्रश्न होताच, पण मग मी चित्रपटांकडे वळायचं ठरवलं. त्याला कारणही तसच आहे... मालिका सुरु असताना ‘एका वेळी एकच’ असं मी ठरवलेलं. त्यामुळे त्याकाळात आलेले चित्रपट मी नाकारले. म्हणून आता चित्रपटांवर लक्ष केंद्रित करायचं असं मी ठरवलंय. चित्रपटांबरोबरच मी चांगल्या वेबसिरीजच्याही शोधात आहे. वेबसिरीजची कथा आवडली तर लवकरच त्या माध्यमातूनही मी प्रेक्षकांच्या भेटीला येईन.’

@@AUTHORINFO_V1@@