सांगलीच्या स्मृतीचा सन्मान ; आयसीसीच्या संघात केला समावेश

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    17-Dec-2019
Total Views |


saf_1  H x W: 0


नवी दिल्ली : आयसीसीने मंगळवारी २०१९ मधील सर्वोत्तम एकदिवसीय आणि टी-२० महिला खेळाडूंच्या संघाची घोषणा केली. या दोन्ही संघामध्ये भारताच्या स्मृती मानधनाचा समावेश करण्यात आला आहे. महत्वाचे म्हणजे, स्मृतीसह भारताच्या ६ खेळाडूंचा समावेश या संघात आहे. आयसीसी दरवर्षी वर्षभरातील खेळाडूंच्या कामगिरीवरून वर्षाअखेरीस एक संघ जाहीर करतो. यावेळी या संघामध्ये ७ भारतीय महिला क्रिकेटपटूंचा समावेश करण्यात आला आहे.

 

मराठमोळ्या स्मृतीची वर्षभरातील कामगिरी कौतुकास्पद

 

मुलाची सांगलीच्या असलेल्या स्मृतीने गेल्या १-२ वर्षांमध्ये भारतीय महिला क्रिकेट विश्वात आपले मोलाचे योगदान दिले आहे. तिने आतापर्यंत भारताला अनेक विजय मिळवून दिले आहेत. तसेच, तिची कामगिरीही उत्तम राहिली आहे. स्मृतीने वर्षभरात ५१ एकदिवसीय सामने खेळले ज्यामध्ये तिने २,०२५ धावा केल्या. तसेच, तिने वर्षभरामध्ये ६६ टी २० सामने खेळले त्यात तिने १, ४५१ धावा केल्या. तिच्या चांगल्या कामगिरीच्या जोरावर आयसीसीकडून तिला हा बहुमान मिळाला.

 

एकदिवसीय संघात भारताच्या स्मृती मानधना, शिखा पांडे, झुलन गोस्वामी आणि पूनम यादव यांचा समावेश आहे. तर टी-२० संघात स्मृती मानधना, दीप्ती शर्मा, राधा यादव यांनी आपल्या दमदार कामगिरीने जागा पटकावली आहे. आयसीसीच्या २०१९ मधील एकदिवसीय आणि टी-२० संघाचे नेतृत्व ऑस्ट्रेलियाच्या मेग लॅनिंगकडे सोपवण्यात आले आहे.

@@AUTHORINFO_V1@@