शेअर बाजाराचा रेकॉर्ड ब्रेक उच्चांक

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    17-Dec-2019
Total Views |

BSE_1  H x W: 0

 


नवी दिल्ली : जीएसटी दरांमध्ये कुठलाही बदल होणार नसल्याचे स्पष्ट केल्यानंतर शेअर बाजाराच्या सकाळच्या सत्रात तेजी दिसून आली. दिवसअखेर ४१३.४५ अंशांनी वधारत ४१ हजार ३५७.१७ इतक्या उंच्चांकावर पोहोचला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी १११ अंशांनी वधारत १२ हजार १६५.१७ हा उच्चांक गाठला. हाँगकाँग, शांघाई, टोकयो, सिओल या जागतिक शेअर बाजारातील सकारात्मक संकेतांचा परिणाम भारतीय शेअर बाजारावर दिसून आला. अमेरिका आणि चीनमध्ये व्यापार करारानंतर जगभरातील बाजारांमध्ये गुंतवणूक वाढली आहे.

 

अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी आरबीआयतर्फे मध्यस्ती करण्याचे आश्वासन गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी संकेत दिले. 'इंडिया इकॉनॉमिक कॉन्हवेल' परिषदेत माहिती देताना व्याजदर कपातीसंदर्भात लवकरच योग्य वेळ पाहून निर्णय घेणार असल्याचे त्यांनी सांगितले. ऑटो, टेलिकॉम, मेटल, आयटी, एनर्जी या क्षेत्रात खरेदी दिसून आली रिलायन्स इन्फ्रा, शिपिंग कॉर्प, दिवाण हौसिंग, एमएमटीसी, जे. के पेपर, उज्जीवन स्मॉल फायनान्स आदी शेअर तेजीत आहेत. मॅग्मा फिनकॉर्प, वेदांता, स्टार सिमेंट, आयआरबी इन्फ्रा, वोडाफोन आयडिया, श्री सिमेंट आदी शेअरमध्ये घसरण झाली.

 

मुंबई शेअर बाजारातील ३० पैकी २५ शेअर वधारले तर निफ्टीमध्ये ५० पैकी ३९ शेअरमध्ये तेजी दिसून आली. मारूतिचा शेअर १.८ टक्के वधारला. वेदांतामध्ये १.७ टक्के तेजी दिसून आली. येस बॅंक आणि टाटा स्टील प्रत्येकी १ टक्क्यांनी वधारले. भारती एअरटेल ०.९ टक्के आणि इन्फोसिस ०.८ टक्क्यांनी वाढले. एनटीपीसीमध्ये ०.६ टक्क्यांनी घसरण झाली. गेलचा शेअर १ टक्क्यांनी घसरला. ओएनजीसी आणि युपीएल ०.७ टक्क्यांनी घसरले.
@@AUTHORINFO_V1@@