पीएमसी घोटाळाप्रकरणी ईडीकडून पहिले आरोपपत्र दाखल

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    17-Dec-2019
Total Views |

bmc_1  H x W: 0


मुंबई : पीएमसी बँकेतील ६७०० कोटी रुपयांच्या घोटाळ्याप्रकरणी ईडीने सोमवारी पहिले आरोपपत्र दाखल केले. एचडीआयएलचे प्रवर्तक राकेश वाधवन आणि सारंग वाधवन यांच्याविरुद्ध हे आरोपपत्र दाखल केले गेले. मनी लाँड्रिंग प्रतिबंधक कायद्यान्वये विशेष न्यायालयासमोर ईडीने सुमारे ७ हजार पानांचे आरोपपत्र सादर केले.


राकेश आणि सारंग वाधवन यांच्यावर पीएमपीएलए अंतर्गत विविध तरतुदींनुसार गुन्हा दाखल करण्यात आला. या दोघांना मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने अटक केली होती. या घोटाळ्याच्या चौकशी दरम्यान ईडीने या दोघांना ऑक्टोबरमध्ये ताब्यात घेतले होते.


आर्थिक अनियमितता आढळल्याने रिझर्व्ह बँकेने २३ सप्टेंबरळा पीएमसी बँकेवर ६ महिन्यांसाठी निर्बंध घातले होते. बँकेचे एकूण १६ लाख ग्राहक असून आरबीआयच्या निर्बंधांमुळे खातेधारकांना पैसे काढण्यावारही मर्यादा आल्या आहेत. पीएमसीने एचडीआयएलला तब्बल ६७०० कोटींचे कर्ज दिले आहे. एचडीआयएल दिवाळखोरीत गेल्यामुळे हे कर्ज वसूल करणे कठीण झाले आणि बँकही अडचणीत सापडली. या घोटाळ्याप्रकरणी आतापर्यंत पीएमसी बँक आणि एचडीआयएलच्या उच्च अधिकाऱ्यांसह बारा जणांना अटक करण्यात आली आहे.

@@AUTHORINFO_V1@@