शेतकऱ्यांना मदतीची घोषणा केंद्राच्या जिवावर केलेली का ? : देवेंद्र फडणवीस

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    17-Dec-2019
Total Views |


asf_1  H x W: 0

 


नागपूर : मंगळवारी हिवाळी अधिवेशनाचा दुसरा दिवस हा शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या वादाने गाजला. त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्र्यांना अनेक प्रश्न विचारले. "शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबाबत सत्ताधाऱ्यांचा सर्व गोष्टी केंद्राकडे टोलवण्याचा केविलवाणा प्रयत्न सुरू आहे. याआधी सत्ताधाऱ्यांनी केंद्राच्या जिवावर शेतकऱ्यांना मदतीची घोषणा केली होती का?" असा सवाल फडणवीस यांनी केला. विधानसभेबाहेर घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलेत होते.

 

शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या मुद्द्यावरुन भाजपचे आमदार प्रचंड आक्रमक झाले. शेतकऱ्यांना तातडीने मदत जाहीर करण्याची घोषणाबाजी आमदारांनी विधानसभेत केली. "राज्यामध्ये आमचे काळजीवाहू सरकार होते त्यावेळी आम्ही कॅबिनेटमध्ये १० हजार कोटी रुपयांची मान्यता दिली होती. त्यानंतर आमचे सरकार नव्हते, त्यामुळे आम्ही जीआर काढू शकलो नाही." असे फडणवीस यांनी सांगितले.

 

यासोबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी निवडणुकीपूर्वी केलेल्या मागणीचीही फडणवीस यांनी आठवण करून दिली. "मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे सरकार २५ हजार रुपये हेक्टर या दराने २३ हजार कोटी रुपये कधी देणार हे आम्ही त्यांना विचारले आहे. केंद्राकडे सर्व गोष्टी टोलवण्याचा सत्ताधाऱ्यांनी प्रयत्न करू नये. आम्हीही सत्तेत होतो तेव्हा केंद्राने नियमानुसारच पैसे दिले आहेत." अशी माहितीदेखील फडणवीस यांनी दिली.

@@AUTHORINFO_V1@@