नाशिकमध्ये स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या पुतळ्यावर दुग्धाभिषेक

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    17-Dec-2019
Total Views |

savarkar_1  H x


नाशिक : नाशिक मधील पंचवटीतील विनायक दामोदर सावरकर स्मारकात स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला दुग्धाभिषेक करून भाजप युवा मोर्चाने वेगळ्या पद्धतीने राहुल गांधी यांनी केलेल्या वक्तव्याचा निषेध करुन स्वा. सावरकरांना अभिवादन केले. यावेळी शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.


काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या विषयी अपशब्द वापरल्यानंतर सोमवारी भाजप शहर कार्यकारणीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयात समोर धरणे आंदोलन करण्यात आले. त्यानंतर मंगळवारी सकाळी पंचवटीतील आडगाव नाका येथे असणाऱ्या स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला दुग्धाभिषेक करण्यात आला. भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने हा अभिषेक करण्यात आला. यावेळी बोलताना भाजयुमोचे चंद्रशेखर पंचाक्षरी यांनी सांगितले की स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी संपूर्ण देशाला स्वातंत्र्य मिळावे यासाठी जिवाचे रान केले. अशा महान व्यक्तीला संपूर्ण हिंदू समाज दैवत मानत आहे. आणि हिंदू समाजाच्या दैवत बद्दल काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी अपशब्द वापरून घोर अपमान केला आहे. या अपमान बद्दल त्यांनी संपूर्ण देशाची माफी मागावी. परंतु काँग्रेसने आजपर्यंत नेहमीच स्वा. सावरकर यांची अवहेलना केली आहे. त्यांना सातत्याने त्रास देण्याचा प्रयत्न केला आहे. या घटनेचा भाजयुमो निषेध करत असल्याचे ते यावेळी म्हणले.


या वेळी मंडळाचे अध्यक्ष उत्तम उगले
, अजिक्य साने, अमित घुगे, भाजप शहर अध्यक्ष गिरीश पालवे नगरसेवक रुची कुभारकर, सुरेश खेताडे, पचवटी सुनिता पिगळे, सोमनाथ बोडके, धुमाळ आदिंसह अन्य मान्यवर उपस्थित होते.

@@AUTHORINFO_V1@@