ब्रम्होस सुपरसॉनिक क्रूझ क्षेपणास्त्राची चाचणी यशस्वी

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    17-Dec-2019
Total Views |
Bramos _1  H x


 

ओडिशा : संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेतर्फे (डीआरडीओ) ओडीशा चांदीपूर येथून ब्रम्होस सुपरसोनिक क्रुझ क्षेपणास्त्राची मंगळवारी सकाळी यशस्वी चाचणी केली. रक्षा मंत्रालयातील सुत्रांनी ही माहिती दिली. जमिनीवर असताना शत्रूवर वार करणाऱ्या या मोबाईल ऑटोनोमस लॉन्चरद्वारे सकाळी साडेआठ वाजता कॉम्पेक्स ३ येथून परिक्षण करण्यात आले. हे परिक्षण सर्व मापदंडावर सफल झाले. ब्रम्होस हे मध्यम अंतरावर अचूक लक्ष्य भेदणारे क्षेपणास्त्र आहे. हे पाणबुडी, जहाज, लढाऊ विमान आदी ठिकाणांहून लॉन्च केले जाऊ शकते.

 

सद्यस्थितीत चीन आणि पाकिस्तान या लगतच्या राष्ट्रांकडे अशाप्रकारचे कुठलेही क्षेपणास्त्र नाही. सर्व प्रकारच्या परिस्थितीत हे क्षेपणास्त्र डागले जाऊ शकते. रेजिमेंट इंजिनद्वारे क्षेपणास्त्र डागण्याच्या अंतराची क्षमता तिप्पट वाढवली जाऊ शकते. रशिया आणि भारताच्या संयुक्त करारादरम्यान हे विकसित करण्यात आले आहे. भारताची ब्रम्हपुत्रा आणि रशियातील मस्कवा या दोन्ही नद्यांच्या नावांवरून या क्षेपणास्त्राचे नाव ठेवण्यात आले आहे.

@@AUTHORINFO_V1@@