शेतकरी कर्जमाफीसाठी भाजप आक्रमक

    17-Dec-2019
Total Views |

bjp_1  H x W: 0


मुंबई – अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी सावरकरांच्या मुद्द्यावरून आक्रमक झाल्यानंतर आता विरोधीपक्ष दुसऱ्या दिवशी शेतकऱ्यांचे कर्ज लवकरात लवकर माफ व्हावे यासाठी सभागृहाच्या पायऱ्यांवर आंदोलन करणार आहेत. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसंबंधी चर्चा करण्यासाठी भाजपने मंगळवारी सकाळी १० वाजता बैठक आयोजित केली होती.


सत्ताधारी पक्षाकडून आज विधानसभेत विदर्भावर चर्चेचा प्रस्ताव देण्यात आला
आहे. हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी भाजपने स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या अवमानाचा मुद्दा उपस्थित केला होता. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी या मुद्द्यावर सभागृहात चर्चा घेण्याची मागणी केली. मात्र, विधानसभा अध्यक्षांनी हा प्रस्ताव फेटाळून लावला. तसेच स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबद्दल भाजपच्या नेत्यांकडून करण्यात आलेली वक्तव्ये कामकाजातून काढून टाकली. यावर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस चांगलेच आक्रमक झाले. आम्ही महाराष्ट्राच्या विधानसभेत आहोत की ब्रिटनच्या? असा संतप्त सवालही त्यांनी विचारला.