एनईएफटी सुविधा आता २४x७ उपलब्ध

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    16-Dec-2019
Total Views |

neft_1  H x W:


मुंबई : नॅशनल इलेक्ट्रॉनिक्स फंड्स ट्रान्सफर म्हणजेच एनईएफटीच्या माध्यमातून ऑनलाईन व्यवहार सेवा आठवड्याचे सातही दिवसरात्र उपलब्ध असणार आहे. आरबीआयच्या निर्णयाचा ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला आहे. यापूर्वी केवळ बँकेच्या कामकाजाच्या वेळातच एनईएफटीद्वारे व्यवहार करता येत होते.


आरबीआयने यासंदर्भात निवेदन जारी केले आहे. एनईएफटीच्या माध्यमातून एकावेळी २ लाख रुपयांची रक्कम ऑनलाईन हस्तांतर करता येते. एनईएफटीअंतर्गत करण्यात येणारे व्यवहार बँकिंग यंत्रणेमार्फत सर्वसाधारण दिवशी सकाळ आठ वाजल्यापासून ते दुपारी एकपर्यंत पूर्ण करण्यात येतात.


बँकेच्या कामकाज वेळेनंतर व्यवहार केल्यास बँका आपणहून तो व्यवहार स्ट्रेट थ्रू प्रोसेसिंग माध्यमात वळता करतात. एनईएफटीद्वारे व्यवहार केल्यानंतर लाभार्थी खात्यात रक्कम जमा होण्यासाठी किमान दोन तासांचा कालावधी लागतो. हा नियम यापुढेही कायम राहणार असल्याचेही आरबीआयने म्हटले आहे.

@@AUTHORINFO_V1@@