जामिया हिंसाचार व्हॉट्सअप अफवेमुळे : दिल्ली पोलीस

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    16-Dec-2019
Total Views |

Delhi Police _1 &nbs


नवी दिल्ली : नागरिकत्व दुरुस्ती विधेयकाला विरोध करण्यासाठी दिल्लीतील जामिया विद्यापीठात झालेल्या आंदोलनाच्या आणि हिंसाचाराच्या घटना या सोशल मीडियावर पसरवण्यात आलेल्या अफवांमुळे झाल्याचा धक्कादायक खुलासा दिल्ली पोलीसांनी केला आहे. आंदोलकांनी केलेल्या जाळपोळीत ६ बसेससह ८ गाड्यांचे नुकसान झाले, हा सर्व प्रकार अफवामुंळे झाला असून अफवा पसवणाऱ्याची ओळख पटली असल्याची माहिती दिल्ली पोलीसांनी दिली.

 

दिल्ली पोलीसांनी वृत्तसंस्थेला दिलेल्या आपल्या प्रतिक्रीयेत म्हटले आहे कि, "कुणीही अफवा पसरवू नयेत. अफवा पसरवणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल. आम्ही येतो शांतता व सुव्यवस्था राखण्याचा पूर्णपणे प्रयत्न करत आहोत. हिंसाचार भडकवण्याचा प्रयत्न करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल." पोलीसांवर होत असलेल्या आरोपांवरही त्यांनी उत्तर दिले आहेत. 'पोलीसांवर बसमध्ये आगी लावल्याचा आरोप होत आहे. त्याबद्दल आम्ही सांगू इच्छितो कि, आम्ही आग विझवणाऱ्यांमध्ये होतो.', असे ते म्हणाले.
 

जामिया विद्यापीठाच्या कुलगुरू नजमा अख्तर यांनी पोलीसांवर विद्यापीठात घुसखोरी केल्याचा आरोप केला आहे. विद्यार्थ्यांना धमकावण्यात आल्याने या प्रकरणी पोलीसांविरोधात तक्रार करू, असा इशारा त्यांनी दिला आहे. हिंसाचारात विद्यापीठाचे मोठे नुकसान झाले असल्याचे त्यांनी सांगितले आहे.

 

काय होती 'ती' अफवा ?

दिल्लीत रविवारी झालेल्या हिंसाचारप्रकरणी एक अफवा उठल्याने हा प्रकार घडल्याचे पोलीसांनी सांगितले आहे. आंदोलनात दोन विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची अफवा पसरवण्यात आल्याने हा हिंसाचार घडल्याचे पोलीसांनी सांगितले आहे. मात्र, या प्रकरणात दोनशे विद्यार्थी जखमी झाल्याचे कुलगुरु नजमा अख्तर यांनी म्हटले आहे.

@@AUTHORINFO_V1@@