आता सादर होणार 'आपलं बजेट'

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    16-Dec-2019
Total Views |
My gov _1  H x


अर्थसंकल्पाबद्दल सूचना करण्याचे सरकारचे आवाहन



नवी दिल्ली : केंद्र सरकारतर्फे येत्या अर्थसंकल्पाची तयारी सुरू केली आहे. त्यासाठी अर्थमंत्रालयातर्फे विशेष प्रयत्न सुरू करण्यात आले आहेत. अर्थमंत्रालयातर्फे देशातील औद्योगिक संघटना आणि संस्थांची मदत घेत आहेत. त्याचप्रमाणे देशातील सर्वसामान्य नागरिकांची मतेही मागवण्यात आली आहेत.

 

२०२०पर्यंत नोंदवू शकता मते

अर्थमंत्रालयाने म्हटले आहे कि, 'अर्थसंकल्प २०२०-२१'बद्दल कुणाला सल्ला व मते नोंदवू इच्छित असल्यास २० जानेवारी २०२० पर्यंत मायजीओव्हीडॉटइन https://www.mygov.in/group-issue/inviting-ideas-and-suggestions-union-budget-2020-2021 या लिंकवर जाऊन आपले मत नोंदवावे, असे आवाहन केले आहे. अर्थमंत्रालयातर्फे या सल्ल्यांची दखल घेतली जाईल. मंत्रालयातर्फे आयकर, वित्त, शेती, आरोग्य, शिक्षण, जलसंधारण, संरक्षण, रोजगार, जीएसटी, रेल्वे आदी क्षेत्रांबद्दल आपली मते नोंदवण्याचे आवाहन केले आहे.

 

अर्थमंत्री निर्मला सितारामन यांनी घेतला आढावा

अर्थसंकल्पाबद्दलच्या सूचनांसंदर्भात अर्थमंत्री निर्मला सितारमण यांनी डिजिटल इकॉनॉमी, फिनटेक आणि स्टार्टअप्स संबंधीतील प्रतिनिधी मंडळांशी चर्चा केली. डेटा संबंधित वापर आणि समस्या यांवर चर्चा करण्यात आली. एमएसएमई क्षेत्रात तंत्रज्ञानाच्या भागीदारी संदर्भातील विचार केला जाऊ शकतो. डिजिटल क्षेत्रात सरकारची भागीदारी आणि स्टार्टअप्स संदर्भात नव्या योजनांचा सामावेश करण्याबद्दल यावेळी चर्चा झाली.

@@AUTHORINFO_V1@@