राहुल गांधी माफी मागत नाहीत, तोपर्यंत आम्ही शांत बसणार नाही : फडणवीस

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    16-Dec-2019
Total Views |

Veer _1  H x W:

 

मी पण सावरकर ! भाजपचा महाविकास आघाडीवर हल्लाबोल 



नागपूर : नागपूर विधिमंडळ अधिवेशनाला सोमवारपासून सुरुवात झाली. विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात भाजपने 'मी पण सावरकर', अशी टोपी घालून राहुल गांधींनी केलेल्या वक्तव्याचा निषेध केला. सभागृहाबाहेर झालेल्या या आंदोलनाचे पडसाद सभागृहातही उमटले. भाजपच्या सर्व आमदारांनी मी पण सावरकर अशी टोपी घालून काँग्रेस आणि महाविकास आघाडी सरकारचा निषेध व्यक्त केला.

 

देवेंद्र फडणवीस म्हणाले, "स्वातंत्र्यवीर सावरकरांचे नाव महाराष्ट्राच्या विधीमंडळात घेण्यासाठी कुणाला अडचण आहे का?. ज्या स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी अंदमानच्या तुरुंगात देशासाठी काळ्यापाण्याची शिक्षा भोगली त्यांचे नाव घेण्यासाठी कुणाची परवानगी घ्यायला हवी का ?" असा सवाल त्यांनी विचारला. सावरकरांचे नाव आणि त्याचा उल्लेख विधानसभा अध्यक्षांनी कामकाजातून काढून टाकण्यात आले त्यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि त्यांचे नेते गप्प का बसले, सावरकरांबद्दल बोलण्यापासून आम्हाला कुणीही रोखू शकत नाही. जोपर्यंत राहुल गांधी माफी मागत नाहीत तोपर्यंत आम्ही शांत बसणार नाही, असा ईशाराही फडणवीस यांनी दिला.

 

शेतकऱ्यांना हेक्टरी २५ हजारांची मदत करण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली होती. मात्र, शेतकऱ्यांना दिलेले पहिले आश्वासन मुख्यमंत्री पाळू शकले नाहीत. शेतकऱ्यांना त्यांची मदत अद्याप मिळालेली नाही, त्यांच्या तोंडाला पाने पूसण्याचे काम त्यांनी केले त्याचा आम्ही निषेध करतो, असा घणाघात देवेंद्र फडणवीस यांनी सरकारवर केला.

@@AUTHORINFO_V1@@