संवेदनशीलता भाग-६

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    16-Dec-2019
Total Views |


safsaf_1  H x W


प्रत्येक चिकित्सकाने संपूर्ण जबाबदारीने या संवेदनशीलतेच्या प्रवृत्तीला योग्यप्रकारे ओळखून तिचे संरक्षण केले पाहिजे व तिचा वापर माणसाचे आरोग्य टिकवण्यासाठी केला पाहिजे. यासाठी भोवतालचे वातावरण, नैसर्गिक बदल व घडामोडी, अन्न, तसेच औषधी गुणधर्माच्या गोष्टी व विषारी गुणधर्माच्या गोष्टी या सर्वांचा एकत्रित अभ्यास, हा संवेदनशीलतेच्या निकषावर केला पाहिजे.


नैसर्गिक संवेदनशीलता ही प्रत्येक माणसामध्ये दिसून येतेे. ही संवेदनशीलता माणसाचे आरोग्य टिकवून ठेवत असते. शरीरावर व मनावर सतत बाह्य गोष्टींचे, तसेच वातावरणातील बदलांचे आघात होत असतात. परंतु, सर्वच आघातांनी माणूस आजारी पडत नाही. कारण, या बदलांना माणसाची चैतन्यशक्ती अनुरूप प्रतिसाद देत असते व त्यामुळे शरीराच्या सर्व कार्यांचा समतोल सांभाळला जात असतो. यालाच समतोलीक संवेदनशीलता (Normal Susceptibility) असे म्हटले जाते. प्रत्येक चिकित्सकाने संपूर्ण जबाबदारीने या संवेदनशीलतेच्या प्रवृत्तीला योग्यप्रकारे ओळखून तिचे संरक्षण केले पाहिजे व तिचा वापर माणसाचे आरोग्य टिकवण्यासाठी केला पाहिजे. यासाठी भोवतालचे वातावरण, नैसर्गिक बदल व घडामोडी, अन्न, तसेच औषधी गुणधर्माच्या गोष्टी व विषारी गुणधर्माच्या गोष्टी या सर्वांचा एकत्रित अभ्यास, हा संवेदनशीलतेच्या निकषावर केला पाहिजे. चिकित्सकाचे काम नुसते औषध देणे नव्हे, तर रुग्णाला रोगमुक्त करून त्याच्या आरोग्याचे संरक्षण करणे, हे सुद्धा आहे. यालाच आरोग्याचा संरक्षक (Preserver of health) असे म्हटले जाते. संवेदनशीलता पूर्णपणे जाणून घेण्यासाठी चिकित्सकाला खालील गोष्टींचे ज्ञान असणे अत्यंत गरजेचे असते.

 

) रोगाचे ज्ञान (knowledge of disease)

) औषधाचे ज्ञान (knowledge of medicine)

) रोगनिदान व योग्य औषध शोधण्याची कला

४) योग्य औषध योग्य त्या मात्रेत निवडून ते किती कालावधीत द्यावे, हे ठरविणे.

 

याचबरोबर जेव्हा चिकित्सकाला 'आरोग्याचे संरक्षक' म्हटले जाते, तेव्हा त्याची जबाबदारी नुसती रोग बरा करण्याची नसते, तर रोगानंतर परत मिळालेले आरोग्य टिकविण्याचीही असते. म्हणूनच त्याला रुग्णाच्या सवयी, रोगनिवारणातील अडथळे (Obstacles to Recovery) याचाही अभ्यास करावा लागतो. त्याचप्रमाणे रोगाच्या वाढीला तसेच रोगाच्या कारणांनाही प्रतिबंध घालणे गरजेचे असते. यासाठी रुग्णांच्या काही सवयींमध्ये बदल करावे लागतात. रुग्णाला आजूबाजूच्या वातावरणाशीही कसे जुळवून घेता येईल, त्याचा अभ्यास करून मग चिकित्सकाला ते रुग्णाला सांगावे लागते. मुळात रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत होऊन रोग का झाला, याची मूळ कारणे शोधून काढावी लागतात.

 

आजाराचे मूळ कारण (Fundamental Cause)

आजार वृद्धिंगत होण्याची कारणे (Exciting Cause)

आजार चालू राहण्याची कारणे (Mantaining Cause)

 

या कारणांचा सखोल अभ्यास करावा लागतो. इतर औषधोपचार पद्धतींमध्ये माहीत नाही, पण होमियोपॅथीमध्ये तरी या गोष्टींचा पूर्ण अभ्यास करावा लागतो. तेव्हा कुठे मग चिकित्सक हा 'आरोग्याचा संरक्षक' असे म्हणवून घेण्यास पात्र ठरतो. या आरोग्याच्या संरक्षणामध्ये माणसाची संवेदनशीलता अतिशय महत्त्वाची भूमिका बजावत असते व या संवेदनशीलतेला धक्का न देता रुग्णाला निरोगी करणे, हे होमियोपॅथीमध्येच शक्य होते. याबद्दल विस्ताराने माहिती आपण पुढील भागामध्ये पाहूया.

 

- डॉ. मंदार पाटकर

@@AUTHORINFO_V1@@