आझम खान यांच्या मुलाची आमदारकी रद्द

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    16-Dec-2019
Total Views |

azaM Khan_1  H

 


नवी दिल्ली : समाजवादी पक्षाचे खासदार आझम खान यांना अलाहाबाद उच्च न्यायालयाने मोठा दणका दिला आहे. त्यांचा मुलगा अब्दुल्ला आझम याची आमदारकी रद्द ठरवली आहे. निवडणूक लढवण्यासाठी वय पूर्ण बसत नसतानाही खोटी कागदपत्रे व दाखला देऊन निवडणूक लढल्याचा आरोप त्यांच्यावर होता. आरोप सिद्ध करण्यात आला आहे.

 

अब्दुल्लाच्या विरोधात बसप उमेदवार नवाब काझीम यांनी तक्रार दाखल केली होती. निवडणूक लढवण्यासाठी आपले वय २५ वर्षे पूर्ण आहे, हे दाखवण्यासाठी त्याने खोटी कागदपत्रे सादर केली. या प्रकरणी न्यायालयाने २७ सप्टेंबरपर्यंत निकाल राखून ठेवला. न्यायमूर्ती एस. पी. केसरवानी यांनी हा निकाल दिला आहे.
@@AUTHORINFO_V1@@