यंदा ६३वी महाराष्ट्र केसरी स्पर्धा पुण्यात !

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    16-Dec-2019
Total Views |


saf_1  H x W: 0


पुणे : महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेची ६३ वी महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा यंदा पुण्यात पार पडणार आहे. पुण्याच्या बालेवाडी येथील शिवछत्रती क्रीडानगरी येथे या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा पुढील वर्षी २ ते ७ जानेवारी या दरम्यान रंगणार आहे. नेहमीप्रमाणे माती आणि गादी अशा दोन्ही प्रकारात ही स्पर्धा होणार आहे.

 

याआधी २०१७मध्ये पुण्यातील भुगाव येथे ही स्पर्धा झाली होती तर मागीलवर्षी जालना येथे ही स्पर्धा पार पडली होती. तेव्हा बाला रफीक शेखने महाराष्ट्र केसरी स्पर्धेचे विजेतेपद जिंकले होते. पुणे जिल्ह्याला तब्बल १२ व्यांदा या स्पर्धेचे आयोजन करण्याचा मान मिळाला आहे. ही स्पर्धा सलग ३ वेळा जिंकण्याची कामगिरी आजपर्यंत केवळ २ मल्लांना करता आली आहे. २०१४ ते २०१६ असे सलग तीन वेळा जळगावचा विजय चौधरी तर २०११ ते २०१३ असे सलग तीन वर्ष नरसिंग यादव महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा जिंकलेली आहे.

@@AUTHORINFO_V1@@