मध्य रेल्वे गर्दीचा बळी : २२ वर्षीय तरुणी लोकलमधून पडून मृत्यू

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    16-Dec-2019
Total Views |



sdf_1  H x W: 0

 


ठाणे : एकीकडे मध्य रेल्वेवर एसी लोकल चालवण्यात येत आहे तर, दुसरीकडे डोंबिवलीसह मुंबईतील महत्वाच्या स्थानकांवरील वाढता गर्दीचा ताण हा गंभीर प्रश्न मुंबईकरांसमोर उभा आहे. सोमवारी सकाळी ९ वाजता डोंबिवली ते कोपर स्थानकादरम्यान २२ वर्षीय तरुणीचा लोकलमधून पडून मृत्यू झाला. चार्मी प्रसाद असे या मृत तरुणीचे नाव असून ती डोंबिवलीची रहिवासी होती.

 

सोमवारी सकाळी ८.५३ ची लोकल चार्मीने पकडली होती. मात्र प्रचंड गर्दीमुळे आत न जाता आल्याने चार्मी बाहेर लटकून राहिली आणि कोपर स्टेशनजवळ तोल जाऊन पडली. त्यानंतर तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र रुग्णालयात उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. डोंबिवली स्थानकामधील गर्दी हा एक महत्वाचा मुद्दा बनला आहे. यावर लवकरात लवकर तोडगा निघावा अशी मागणी रहिवाशांकडून करण्यात येत आहे.

@@AUTHORINFO_V1@@