शबरीमला प्रकरणी निर्णय देण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार

    13-Dec-2019
Total Views |

sc_1  H x W: 0


नवी दिल्ली :  केरळच्या शबरीमला मंदिरात जाण्यास बंदी घातलेल्या रेहाना फातिमा आणि बिंदु अम्मिनी यांच्या याचिकेवर आदेश देण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला आहे. काही मुद्दे असे आहेत ज्यामुळे देशामध्ये तणावाचे वातावरण निर्माण होऊ शकते, हा मुद्दा देखील तसाच असल्याचे सरन्यायाधिशांनी म्हटले. आम्हाला कोणती हिंसा नकोय, मंदिरात पोलीस असणे ही देखील खूप चांगली गोष्ट नाही. हा खूप भावनात्मक मुद्दा आहे. हजारो वर्षांपासून इथे परंपरा सुरु आहे.

शबरीमला प्रकरणीचा अंतिम निर्णयाचा फैसला आता ७ न्यायाधिशांच्या खंडपीठाकडे सोपवण्यात आला आहे. हेच खंडपीठ महिलांच्या शबरीमाला प्रवेशावर निर्णय घेणार आहे. सर्वोच्च न्यायालयाने आधीचा निर्णय कायम ठेवला आहे.