एफ१६ जेटचा भारताविरुद्ध वापर केल्याबद्दल पाकिस्तानला अमेरिकेने फटकारले : अहवाल

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    12-Dec-2019
Total Views |


pulwama_1  H x


वॉशिंग्टन : भारताविरूद्ध एफ१६ या लढाऊ विमान वापरल्याबद्दल अमेरिकेने ऑगस्टमध्ये पाकिस्तानला फटकारले. अमेरिकन मीडिया ग्रुप 'यूएस न्यूज वर्ल्ड रिपोर्ट' ने हा खुलासा केला आहे. त्याच्या अहवालानुसार ट्रम्प प्रशासनाच्या उच्च अधिकाऱ्याने पाकिस्तानी हवाई दलाच्या प्रमुखांनाही पत्र लिहून एफ१६ चा वापर करण्याबद्दल विचारणा केली आहे. यामध्ये पाकिस्तानने कोणतीही माहिती न देता एफ१६ जेट वापरल्याचा आरोप केला होता. या अधिकाऱ्याने याबाबत विचारणा करताना पाकिस्तानने दोन देशांमधील सामान्य सुरक्षा कराराचे उल्लंघन केले असल्याचे ही नमूद केले.



अमेरिकेने कराराअंतर्गत पाकिस्तानला एफ १६ विमान दिले आहे


करारानुसार अमेरिकेने पाकिस्तानला एफ१६ विमान दिले आहे. त्याकराराअंतर्गत पाक सरकार अमेरिकेला माहिती न देता जेट्स वापरु शकत नाही. एफ१६चा वापर एखाद्या देशाविरूद्ध भडकवण्यासाठी थेट कारवाईमध्ये केला जाऊ शकत नाही. या व्यतिरिक्त पाकिस्तानला अमेरिकेला एफ १६ विमानांचे ठिकाण बदलण्याचीही माहिती द्यावी लागते.



पाकिस्तानने भारतावर पुलवामा हल्ल्यात
एफ १६ चा वापर केला होता

फेब्रुवारीमध्ये काश्मीरच्या पुलवामा येथे सीआरपीएफच्या जवानांवर झालेल्या हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाने पाकिस्तानमधील बालाकोटमध्ये दहशतवाद्यांच्या तळांवर बॉम्बस्फोट केला होता. त्याला प्रत्युत्तर म्हणून पाकिस्तानी हवाई दलाने एफ१६ विमान पाठवून क्षेपणास्त्रांसह भारताच्या सैन्य तळांना लक्ष्य करण्याचा प्रयत्न केला. भारतीय हवाई दलाचे कमांडर अभिनंदन वर्तमान यांनी प्रत्युत्तरात एफ -१६ जेट पाडले होते. भारताने युद्धाचा उपक्रम म्हणून संबोधताना एफ१६ वापरल्याबद्दल अमेरिकेला कळवले होते. मात्र, त्यावेळी अमेरिका व पाकिस्तानकडून कोणताही प्रतिसाद आला नव्हता.

@@AUTHORINFO_V1@@