भारताची पाकिस्तानला चेतावणी ; भारताच्या अंतर्गत मुद्यांमध्ये बोलू नये

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    12-Dec-2019
Total Views |


raveesh_1  H x


नवी दिल्ली : पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी नागरिकत्व दुरुस्ती विधेयकावरून केलेल्या टिप्पणीला भारताकडून चोख प्रत्युत्तर दिले गेले आहे. परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रवीश कुमार यांनी पाकिस्तानच्या पंतप्रधानांच्या टिप्पणीवर असे म्हटले आहे की, 'पाकिस्तानच्या पंतप्रधानांच्या प्रत्येक वक्तव्याचे उत्तर देण्याची आम्हाला गरज नाही असे आम्हाला वाटते. त्यांची सर्व विधाने अयोग्य आहेत. त्यांनी भारताच्या अंतर्गत बाबींवर भाष्य करण्यापेक्षा पाकिस्तानमधील अल्पसंख्याकांच्या परिस्थितीवर लक्ष केंद्रित केले पाहिजे." परराष्ट्र मंत्रालयाच्या पत्रकार परिषदेदरम्यान ते बोलत होते.



भारताच्या परराष्ट्रमंत्र्यांनी बांगलादेश दौरा रद्द करण्याबाबत रवीश कुमार म्हणाले की
, त्यांचा हा दौरा रद्द करण्याबाबत त्यांनी स्पष्टीकरण दिले आहे. दोन्ही देशांमधील नातं मजबूत आहे. दोन्ही देशांच्या नेत्यांनी म्हटल्याप्रमाणे, हा दोन्ही देशांमधील संबंधांचा सुवर्णकाळ आहे.



नागरिकत्व दुरुस्ती विधेयकाबाबत बांगलादेशच्या परराष्ट्रमंत्र्यांनी केलेल्या टिप्पणीवर कुमार यांनी सांगितले की
, "त्यांचा गैरसमज झाला आहे. आम्ही त्यांना विश्वास दिला आहे की सध्याच्या सरकारात कोणताही धार्मिक छळ होत नाही. बांगलादेशहून भारतात आश्रय शोधणाऱ्या स्थलांतरितांनी लष्करी शासनकाळात आणि बांगलादेशातील मागील सरकारच्या काळात धार्मिक कारणास्तव छळ व अत्याचार सहन केले. आम्ही यावर विचार केला आहे. आम्हाला माहित आहे की, बांगलादेशातील सध्याच्या सरकारने अल्पसंख्याकांच्या घटनात्मक तरतुदींनुसार चिंता दूर करण्यासाठी अनेक पावले उचलली आहेत."

@@AUTHORINFO_V1@@