आर्थिक आव्हाने पेलण्यासाठी बॅंकांनी तयार राहावे : आरबीआय गव्हर्नर

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    12-Dec-2019
Total Views |
RBI _1  H x W:
 


मुंबई : आर्थिक मंदीने अर्थव्यवस्था पिचलेली असून नजीकच्या काळात ही आव्हाने पेलण्यासाठी सज्ज व्हा, असे निर्देश आरबीआय गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी बॅंकांना दिले आहेत. येत्या काळात ही परिस्थिती आणखी बिकट होणार असल्याचेही ते म्हणाले. 'आरबीआय'ने जीडीपीदराचा अंदाज ५ टक्के केला आहे. दुसऱ्या तिमाहीत प्रत्यक्ष जीडीपी ४.५ टक्क्यांपर्यंत खाली आला या पार्श्वभूमीवर दास यांचे हे विधान महत्वाचे ठरत आहे.

 

सार्वजनिक क्षेत्रातील बँकांच्या प्रमुखांशी आर्थिक स्थितीबद्दल चर्चा करण्यात आली. आरबीआयने प्रसिद्धी पत्रकात ही माहिती दिली. दास यांच्या मते, "सध्या आर्थिक परिस्थिती बेताची आहे. बँकांनी थकीत कर्जे कमी करण्याच्यादृष्टीने तातडीने कामाला लागायला हवे. विकासदरात होणारी घसरण चिंता वाढवणारी आहे. अशा कठीण परिस्थिती बँकांनी सर्व संकटांचा सामना करण्यासाठी सुसज्ज राहायला हवे."

 

बॅंकींग अर्थव्यवस्थेत सुधारणा

बँकिंग व्यवस्था मजबूत करण्याचा प्रयत्न केला जात असून सरकारतर्फे सुधारणा केल्या जात असल्याचे दास यांनी सांगितले. बॅंकने विकासदाराचा अंदाज कमी केला असताना बाजारातील वाढत्या महागाईबाबत चिंता व्यक्त केली. काही महिन्यात महागाईत वाढ होईल, अशी चिंताही आरबीआयने व्यक्त केली आहे.

 

व्याजदर कपात सर्वसामान्यांसाठीच

आरबीआयने सतत व्याजदर कपात केल्यानंतरही बऱ्याच बॅंकांनी आपली कर्जे अद्याप स्वस्त केली नाही, किंवा व्याजदरात कपात केलेली नाही. त्यामुळे रेपो दर कपातीचा लाभ ग्राहकांपर्यंत पोहचला पाहिजे यासाठीही त्यांनी बँकांच्या प्रमुखांशी चर्चा केली. रिझर्व्ह बँकेने आतापर्यंत पाच वेळा रेपो दरात कपात केली आहे. मात्र बँकांकडून व्याजदर कपातीचा लाभ ग्राहकांपर्यंत पोहचवण्यात टाळाटाळ केली जात असल्याची नाराजी दास यांनी व्यक्त केली आहे.

@@AUTHORINFO_V1@@