तुमचे हक्क कोणी हिरवणार नाही : पंतप्रधानांची आसामवासीयांना ग्वाही

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    12-Dec-2019
Total Views |


saf_1  H x W: 0

 


नवी दिल्ली : नागरिकत्व सुधारणा विधायक लोकसभेनंतर बुधवारी राज्यसभेतही मंजूर झाले. परंतु, यावरून आसाममध्ये अनेक दिवसापासून निदर्शने सुरु आहे. "आसाममधील नागरिकांनी घाबरण्याचे काहीच कारण नाही. तुम्हाला मी सांगू इच्छितो की, कोणीही तुमचे हक्क, तुमची ओळख आणि तुमची सुंदर संस्कृती तुमच्यापासून हिरावून घेऊ शकत नाही." असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आसामवासीयांना दिला आहे. आसाममधील चाललेल्या निदर्शनांच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधानांनी त्यांना ट्विटरवरून हे आवाहन केले.

 
 
 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारने लोकसभेनंतर राज्यसभेतही नागरिकत्व सुधारणा विधायक संमत केले. मोदी सरकारचे गेले ६ महिन्यात हे तिसरे मोठे यश आहे.

 
 
 
नव्या विधेयकाने आता भारतात आलेल्या धार्मिक अल्पसंख्याक शरणार्थीना नागरिकत्व मिळू शकेल. समाजमाध्यमात अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. "नागरिकत्व दुरुस्ती विधेयक देशाच्या इतिहासात मैलाचा दगड ठरेल. गेल्या कित्येक वर्षांपासून ज्यांच्यावर अन्याय झाला आहे अशा लोकांचे दु:ख या विधेयकामुळे दूर होईल," असेही पंतप्रधान मोदी यांनी सांगितले.
@@AUTHORINFO_V1@@