अखेर खातेवाटपाला मुहूर्त मिळाला

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    12-Dec-2019
Total Views |
CM _1  H x W: 0



मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नव्या सरकारच्या खातेवाटपाला अखेर मुहूर्त मिळाला आहे. नव्या सरकारच्या हिवाळी अधिवेशनाच्या तोंडावर हे खातेवाटप करण्यात आले आहे. उद्धव ठाकरे यांच्याकडे खातेवाटप न झालेली सर्व खाती देण्यात आली आहेत.

1) एकनाथ शिंदे : गृह, नगर विकास, वने व पर्यावरण, पाणीपुरवठा व स्वच्छता, मृद व जलसंधारण, पर्यटन, सार्वजनिक बांधकाम (सार्व. उपक्रम), संसदीय कार्य, माजी सैनिक कल्याण

 

2) सुभाष देसाई : उद्योग व खनिकर्म, कृषी, उच्च व तंत्र शिक्षण, क्रिडा व युवक कल्याण, रोहयो, फलोत्पादन, परिवहन, मराठी भाषा.

 

3) छगन भुजबळ : ग्रामविकास, जलसंपदा, लाभक्षेत्र विकास, सामाजिक न्याय, विशेष सहाय्य, राज्य उत्पादन शुल्क, कौशल्य विकास व उद्योजकता, अन्न व औषध प्रशासन

 

4) जयंत पाटील : वित्त व नियोजन, गृहनिर्माण, सार्वजनिक आरोग्य, सहकार व पणन, अन्न व नागरी पुरवठा, ग्राहक कल्याण, कामगार, अल्पसंख्य कल्याण

5) बाळासाहेब थोरात : महसूल, ऊर्जा, अपरांपरागत ऊर्जा, वैद्यकीय शिक्षण, शालेय शिक्षण, पशू संवर्धन दुग्धविकास व मत्स्यव्यवसाय .

 

6) नितीन राऊत : सार्वजनिक बांधकाम (सार्व. उपक्रम सोडून) आदिवासी विकास, महिला व बाल विकास, वस्त्रोद्योग, मदत व पुनर्वसन, इतर मागासवर्ग कल्याण, विमुक्त जाती भटक्या जमाती कल्याण, विशेष मागास प्रवर्ग कल्याण.

@@AUTHORINFO_V1@@