भारतीय फलंदाजांची मांदियाळी ; टॉप १०मध्ये ३ भारतीय

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    12-Dec-2019
Total Views |


saf_1  H x W: 0


नवी दिल्ली : कसोटी आणि एकदिवसीय क्रमवारीत भारतीयांनी नेहमीच वर्चस्व गाजवले आहे. परंतु, गेले काही महिने टी-२०मध्ये भारताचे प्रदर्शन हे सामान्य होते. त्यानंतर नुकतेच झालेल्या वेस्ट इंडिज बरोबरच्या टी-२० मालिकेमध्ये २-१ असा विजय मिळवून भारतीय संघाने टी-२० फॉरमॅटमध्ये गमावलेला लय पुन्हा एकदा मिळवली. भारतीय संघाच्या ३ फलंदाजांनी आयसीसीच्या टी-२० क्रमवारीत पुन्हा प्रवेश मिळवला आहे.

 

वेस्ट इंडिजविरुद्ध झालेल्या तिसऱ्या आणि निर्णायक सामन्यामध्ये भारताने विजय मिळवून मालिका खिशात घातली. यामध्ये भारताच्या त्रिकुटाने महत्वाची भूमिका निभावली. पहिले रोहित शर्मा आणि के.एल.राहुल यांनी शतकी भागीदारी करत अनुक्रमे ७१ आणि ९१ धावा केल्या. त्यानंतर कर्णधार कोहलीने स्फोटक फलंदाजी करत ७० धावांची खेळी केली आणि सामना जिंकून दिला. यामध्ये ७३४ गुणांसह ९व्या स्थानावरून ६व्या स्थानावर झेप घेतली. तर, ६८६ गुणांसह रोहित ९व्या स्थानावर आहे. तसेच, कर्णधार कोहलीच्या स्फोटक फलंदाजीने ५ क्रमांकाची झेप घेतली. म्हणजेच कोहली आता ६८५ गुणांसह १०व्या स्थानावर झेप घेतली आहे.

@@AUTHORINFO_V1@@