हिंदू संघटक : डॉ. बा. शि. मुंजे

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    12-Dec-2019
Total Views |


vividha_1  H x


हिंदूंमधील जात्याभिमान दूर होऊन सर्व हिंदू समाज एक व्हावा, त्यांच्यामधील दुहीची भावना दूर व्हावी, यासाठी ते आयुष्यभर झिजले. नाशिकच्या काळाराम मंदिरातील मंदिर प्रवेशाच्या डॉ. आंबेडकरांच्या सत्याग्रहाच्या वेळीदेखील मध्यस्थी करून अस्पृश्यांना सन्मानाची वागणूक द्यावी व आदरपूर्वक त्यांना मंदिर प्रवेश करू द्यावा, यासाठी ते प्रयत्नरत होते. त्यांनी स्थापन केलेल्या ‘भोंसला सैनिकी शाळेत’देखील कधीही जातिभेदाला थारा दिला गेला नाही.



१८५७च्या बंडानंतर संपूर्ण भारतावर आपले नियंत्रण प्रस्थापित करणार्‍या इंग्रज सरकारचा भारतातील मुसलमानांवर विश्वास राहिला नव्हता
. तसा तो हिंदूंवरही नव्हता, पण तरीही काही लोक सरकारच्या बाजूने विचार करीत होते. त्याकाळी सुधारकांचा आणि शिक्षितांचा एक वर्ग इंग्रज शासनही एक इष्टापत्ती समजत असे. राष्ट्रीय सभेची स्थापना झाल्यानंतरदेखील अनेक नेत्यांना ब्रिटिश अंमलाखालीच सुधारणा हव्या होत्या. या सर्व विचारांच्या स्वधर्म ताडणाच्या आणि स्वउपेक्षेच्या काळात लोकांना आपल्या संस्कृतीची आणि परंपरांची जाणीव करून देत, त्यांच्यातील असंतोषाला स्वाभिमान व राष्ट्रप्रेमाची जोड देण्याचे, दिशा देण्याचे व वाचा फोडण्याचे काम लोकमान्य टिळकांनी केले. याच काळात चेपल्या गेलेल्या मुस्लीम समाजाला इंग्रजांच्या जवळ नेण्याचा व त्यांना आपण शासक होतो व पुढेही राहू अशी उभारी देण्याचा प्रयत्न सर सैय्यद अहमद खान यांनी केला.



या प्रयत्नातूनच पुढे अलिगढ युनिव्हर्सिटीची स्थापना झाली
. मुस्लीम समाज मुळात आक्रमक होताच. त्यात राष्ट्रीय चळवळीत हिंदू-मुस्लीम ऐकीकरिता टिळकांनी ‘लखनौ करार’ घडवून आणला. त्यामुळे हिंदू समाजाला मागे रेटून भविष्यात मुस्लीम वर्चस्व बहुसंख्य असलेल्या हिंदू समाजावर प्रस्थापित करता येईल, अशी आशा मुसलमानांच्या मनात निर्माण झाली. ‘लखनौ करारा’ला लखनौ काँग्रेसच्या अधिवेशनात विरोध करणारे एकमेव नेते म्हणजे डॉ. मुंजे होय. आपण २३ कोटी हिंदू सात कोटी मुसलमांनांशिवायदेखील स्वराज्य मिळवू शकतो आणि राखूही शकतो, असा विश्वास त्याकाळी फक्त डॉ. मुंजेंना होता असेच म्हणावे लागते. टिळक युगाचा अस्त होऊन राष्ट्रीय पातळीवर गांधीजींचा उदय झाला. त्यांच्या अहिंसेच्या अव्यवहार्य व दुबळ्या संकल्पनेतून मुस्लीम अनुनयाचे युग सुरू झाले. टिळकांच्या काळात राष्ट्रीय विचार करणारे बॅ. जिना आता मुस्लिमांकरिता वेगळे मतदारसंघ, लोकसंख्येपेक्षा जास्त प्रतिनिधित्व यावर आपला अधिकार असल्यासारखे मुद्दे आक्रमकतेने मांडू लागले. अलिबंधू आणि जिना गांधीजींना जुमानतच नव्हते. त्यात भर म्हणून ‘मॅक्डोनाल्ड योजना’, ‘कॅम्युनल अ‍ॅवॉर्ड’ अशा नावाने प्रसिद्ध झाली. ही योजना अर्थातच हिंदूंना हानिकारक व मुसलामानांना अनुकूल होती. यामुळे हिंदू-मुस्लिमांमध्ये असलेली दरी वाढू लागली व देशभर दंगली घडू लागल्या. मुस्लीम अनुनयाच्या धोरणामुळे काँग्रेस या संदर्भातील हिंदूंच्या कोणत्याही तक्रारी ऐकून घेण्यास तयार नसे. यावर उपाययोजना म्हणून हिंदू संघटन करण्याकरिता हिंदू सभेची स्थापना करण्यात आली.



नागपुरातदेखील हिंदू सभेची स्थापना डॉ
. मुंजेंच्या अध्यक्षतेखाली करण्यात आली. त्यानंतर १९२३ मध्ये क्षुल्लक कारणावरून करण्यात आलेली मुसलमानांची आगळीक डॉ. मुंजेंनी राजे लक्ष्मणराव भोसले, डॉ. खरे, डॉ. चोळकर, डॉ. हेडगेवार यांच्या साथीने मोडून काढली. यानंतरच्या सर्व प्रकरणांमध्ये वरील सर्व नेत्यांच्या प्रयत्नांनी हिंदूंनी मुस्लीम आक्रमकतेला मध्य प्रांतामध्ये उत्तम रीतीने तोंड दिले व प्रतिपक्षाची जास्त हानी झाली. विविध ठिकाणी होणार्‍या हिंदू सभेच्या अध्यक्षपदावरून हिंदू संघटनेची व एकतेची आवश्यकता डॉ. मुंजे आपल्या भाषणांमधून लोकांना समाजावून देत होते. त्याकरिता समाजाला प्रोत्साहित करीत होते. जातीविरहित एकसंध हिंदू समाजाची आवश्यकता डॉ. मुंजे आपल्या प्रत्येक भाषणात प्रतिपादीत करत. १९३३ मध्ये सागर येथे झालेल्या हिंदू सभेच्या अध्यक्षीय भाषणात अस्पृश्यता निवारणाच्या मुद्द्यावर डॉ. मुंजेंनी भर दिला. हिंदूंमधील जात्याभिमान दूर होऊन सर्व हिंदू समाज एक व्हावा, त्यांच्यामधील दुहीची भावना दूर व्हावी, यासाठी ते आयुष्यभर झिजले.




नाशिकच्या काळाराम मंदिरातील मंदिर प्रवेशाच्या डॉ
. आंबेडकरांच्या सत्याग्रहाच्या वेळीदेखील मध्यस्थी करून अस्पृश्यांना सन्मानाची वागणूक द्यावी व आदरपूर्वक त्यांना मंदिर प्रवेश करू द्यावा, यासाठी ते प्रयत्नरत होते. त्यांनी स्थापन केलेल्या ‘भोंसला सैनिकी शाळेत’देखील कधीही जातिभेदाला थारा दिला गेला नाही. सर्व हिंदू एक व्हावे व या समाजाचे सामर्थ्य व क्षात्रतेज प्रकट व्हावे, या दृष्टीने डॉ. मुंजे नेहमीच हिंदू महासभेच्या कार्यक्रमांची आखणी करत व त्याच भावनेने त्यांची अंमलबजावणी होत आहे हेही बघत. स्वधर्मातून परधर्मात गेलेल्या लोकांना हिंदू धर्मात परत आणण्यासाठी त्यांनी शुद्धीकरणाची मोहीमही राबवली. या मोहिमेला गोव्यामध्ये मोठे यशही मिळाले. याच भावनेने सर्व हिंदू एक हे त्यांचे आग्रही प्रतिपादन असे. भारतातील सर्व प्रकारच्या, विचारांच्या नेत्यांशी व मानव समूहांशी त्यांचे अतिशय सौहार्दपूर्ण संबंध होते व ते अखेरपर्यंत कायम राहिले. त्या पारतंत्र्याच्या काळात त्यांनी भविष्याचा घेतलेला वेध व केलेल्या उपाययोजनांची अंमलबजावणी आजही या देशाचे सामर्ध्य, एकात्मता व राष्ट्रीयता वाढविण्यास उपयोगी ठरणारी आहे. अशा या अत्यंत प्रभावी व लोकोत्तर नेत्याला कोटी कोटी प्रणाम!

समाप्त

-डॉ. विवेक राजे 
@@AUTHORINFO_V1@@