हैदराबाद प्रकरणानंतर १.३० लाख जणांनी डाऊनलोड केले 'सुरक्षा' अॅप

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    11-Dec-2019
Total Views |

Suraksha _1  H

 


बंगळुरु : हैदराबाद बलात्कार प्रकरणानंतर बंगळूरुतील १.३० लाख लोकांनी सुरक्षा अॅप डाऊनलोड केले. बंगळुरु उपायुक्त कुलदीप जैन यांनी दिलेल्या माहितीनुसार, या घटनेनंतर हे अॅप डाऊनलोड करणाऱ्यांच्या संख्येत वाढ झाली आहे. २०१७मध्ये हे अॅप डाऊनलोड करण्यात आले होते. त्यापूर्वी २.८ लोकांनी हे अॅप डाऊनलोड केले होते. हे अॅप डाऊनलोड करणाऱ्या व्यक्तीला मदत मागितल्यानंतर सात सेकंदात उत्तर मिळेल, असा दावा पोलीसांनी केला आहे. बंगळुरुतील पोलीस ठाण्यांमध्ये पेट्रोलिंग करण्यासाठी दुचाकी तैनात केल्या आहेत.

 

कुणीही करू शकतो अॅपचा वापर

सुरक्षा अॅपमध्ये स्त्री पुरुष असा भेद नाही, त्यामुळे कुणीही मदतीसाठी याचा वापर करू शकतो. लोकांमध्ये याबद्दल विशेष जागृती झाली असून अनेकजण याचा योग्य प्रकारे वापर करत असल्याची माहिती पोलीसांनी दिली आहे. जेव्हा हे अॅप लॉन्च करण्यात आले होते, त्यावेळी त्याला योग्य प्रतिसाद मिळाला नव्हता. मात्र, हैदराबाद प्रकरणानंतर या अॅपचा वापर अचानक वाढल्याचे पोलीसांनी केले आहे.

 

'गुगल प्ले स्टोर'वरील सेफ्टी अॅप्स बेभरवशी ?

एका अहवालानुसार, गुगल प्ले स्टोअरवर उपलब्ध असलेल्या दोनशेहून अधिक अॅपपैकी केवळ २० टक्के अॅप्सच कार्यरत आहेत. सायबर तज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, यावर दोन प्रकारची मदत मिळणारे अॅप आहेत. एक ज्यात प्रत्यक्ष पोलीसांची मदत मिळते आणि दुसरे म्हणजे जवळच्या व्यक्तींना नातेवाईकांना याबद्दलची माहिती देऊ शकतो. काही अॅप्समधील फिचरचा महिलांसाठी थेट असा उपयोग होताना दिसत नाही.

@@AUTHORINFO_V1@@