महाविकासआघाडीत 'बिघाडी' ; खातेवाटपावरून एकमत नाही ?

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    11-Dec-2019
Total Views |


saf_1  H x W: 0

 


मुंबई : शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सत्ता स्थापन १५ दिवस होत आले, तरीही अजून उपमुख्यंमत्री पदासहित इतर अनेक पदे अजूनही रिक्त आहेत. कोणती पदे कोणत्या पक्षाला द्यायची यावरून महाविकासआघाडीमध्ये चर्चा, बैठका चालू आहेत. परंतु, अजूनही यांच्यामध्ये एकमत होत नसल्याचे सूत्रांनी सांगितले. जर या तीन खात्यांचे योग्य वाटप होत नसेल आणि दुय्यम स्थानाची खाती काँग्रेसच्या खात्यात पडत असतील, तर सरकारला बाहेरुन पाठिंबा देण्याचा इशारा काँग्रेसने दिला.

 

अजूनही तीन खात्यांवरुन काँग्रेस, शिवसेना आणि राष्ट्रवादीत एकमत झालेले नाही. सार्वजनिक बांधकाम, नगरविकास आणि जलसंधारण या खात्यांवरुन तिन्ही पक्षांमध्ये अजूनही वाद सुरु आहे. या तीन खात्यांचे योग्य वाटप होत नसल्यास सरकारला बाहेरुन पाठिंबा देण्याचा इशारा काँग्रेसने दिला आहे. गृह आणि नगरविकास ही महत्त्वाची खाती शिवसेनेकडे, तर गृहनिर्माण आणि अर्थ ही खाती राष्ट्रवादीकडे असतील, अशी माहिती आहे. परंतु आता नव्या खात्यांवरीन तिन्ही पक्षांमध्ये एकमत नसल्याचे समोर येत आहे.

@@AUTHORINFO_V1@@