शिवसेनेचे राज्यसभेतून पलायन, विधेयकावर मतदानापूर्वीच खासदारांचे वॉक-आउट

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    11-Dec-2019
Total Views |


raut_1  H x W:


नवी दिल्ली: बहुचर्चित नागरिकत्व सुधारणा विधेयकावर राज्यसभेत आज मतदान होणार आहे. नागरिकत्व सुधारणा विधेयकाला कॉंग्रेससह इतर विरोधी पक्षांनी विरोध करण्याची भूमिका घेतली होती. कॉंग्रेसच्या पाठींब्याने महाराष्ट्रात मुख्यमंत्री झालेल्या उद्धव ठाकरे यांनी काल विधेयक समजेपर्यंत भूमिका घेणार नसल्याचे सांगितले होते. कॉंग्रेसच्या भीतीने शिवसेना भूमिका बदलणार अशी शक्यता वर्तविली जात होती.


ठाकरे यांनी कायम मुस्लीम घुसखोरांविषयी आक्रमक पवित्रा घेतला होता. शिवसेना कायम आक्रमक आणि स्वतःच्या भूमिकेवर ठाम राहणारी समजली जात असे. या विधेयकावर लोकसभेत मतदान झालं तेव्हा शिवसेनेने विधेयकाला पाठींबा देण्याचा निर्णय घेतला होता. मात्र आज संजय राउतांसह शिवसेनेच्या सर्व खासदारांनी राज्यसभेतून वॉक-आउट करण्याचा निर्णय घेतला.

@@AUTHORINFO_V1@@