पीएसएलव्हीची अर्धशतकी भरारी यशस्वी

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    11-Dec-2019
Total Views |


isro_1  H x W:


श्रीहरीकोटा : भारतीय अंतराळ संशोधन संस्था(इस्रो)ने बुधवारी दुपारी ३:२५मिनिटांनी भारतीय उपग्रह 'रिसॅट-२ बीआर १' आणि चार इतर देशांतील ९ उपग्रहांचे पीएसएलव्ही प्रक्षेपकाद्वारे यशस्वी प्रक्षेपण केले. हे प्रक्षेपण आंध्र प्रदेशमधील श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रातून झाली. 'बीआर १' रडार हे 'इमेजिंग अर्थ ऑब्जर्वेशन सॅटेलाइट' आहे. या उपग्रहाच्या माध्यमातून ढगांआडून आणि अंधारातही स्पष्ट छायाचित्रे घेऊ शकतो.



तसेच
,पीएसएलव्ही प्रक्षेपकाचे हे ५०वे प्रक्षेपण आहे. ३२० टनांच्या या प्रक्षेपकाची आतापर्यंत ४९ उड्डाणे झाली असून, चांद्रयान १ आणि मंगळयान या दोन अवकाश मोहिमाही पीएसएलव्हीनेच यशस्वीरीत्या प्रक्षेपित केल्या आहेत. तुलनेने कमी खर्च आणि प्रक्षेपणातील अचूकता लक्षात घेऊन जगभरातील अनेक विकसित देश आपले हलके उपग्रह अवकाशात पाठवण्यासाठी 'पीएसएलव्ही'ला पसंती देतात.



श्रीहरिकोटावरुन प्रक्षेपित केले जाणारे ते ७५वे प्रक्षेपक होते. सतीश धवन अंतराळ केंद्रातील
'फर्स्ट लॉन्च पॅड'वरुन केले जाणारे हे ३७वे प्रक्षेपण होते.'रिसॅट-२ बीआर १' पाच वर्षे काम करेल. यात ०.३५ मीटर रिझोल्यूशनचा कॅमरा आहे, म्हणजेच हे ३५ सेंटीमीटर दूरवरील वस्तुंना ओळखू शकतो. कृषी, वन आणि आपत्ती व्यवस्थापनात या उपग्रहाचा उपयोग होणार आहे. याचे वजन ६२८ किलोग्राम आहे.उपग्रहाचे ५७६ किलोमीटरच्या कक्षेत प्रक्षेपण करण्यात येईल.


 

@@AUTHORINFO_V1@@