पारंपारिक पेहरावात बॅनर्जी दाम्पत्याने स्वीकारला 'नोबल' पुरस्कार

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    11-Dec-2019
Total Views |
Nobel Prize _3  


स्टॉकहोम (स्वीडन) : मुळ भारतीय वंशाचे अर्थतज्ज्ञ अभिजीत बॅनर्जी (५८) आणि त्यांच्या पत्नी एस्थर डुफ्लो यांनी मंगळवारी नोबेल पुरस्कार वितरण समारोहाला उपस्थित होते. मात्र, यावेळी त्यांनी परिधान केलेल्या भारतीय पारंपारिक पोशाखाची विशेष चर्चा झाली.


Nobel Prize _4  



अभिजीत बॅनर्जी यांना नोबेल पुरस्कार जाहीर




 बॅनर्जी यांनी कुर्ता आणि सोनेरी रंगाची किनार असलेले धोतर परिधान केले होते. त्यावर एक काळ्या रंगाचा कोट होता. तर त्यांच्या पत्नी डुफ्लो यांनी हिरव्या रंगाची साडी आणि लाल रंगाची मोठी टीकली लावली होती. अर्थशास्त्रातील नोबेल यंदा विभागून देण्यात आला आहे. अभिजीत बॅनर्जी, एस्थर डुफ्लो आणि मायकल क्रेमर (५४) यांना संयुक्तरित्या हा पुरस्कार देण्यात आला आहे. ऑक्टोबरमध्ये या पुरस्कारांची घोषणा झाली होती.

"बॅनर्जी, डुफ्लो आणि क्रेमर यांच्या प्रयोगामुळे विकासात्मक अर्थशास्त्रात बदल"

बॅनर्जी आणि डुफ्लो मॅसोचुरेट्स इन्स्टीट्युट ऑफ टेक्नोलॉजीमध्ये (एमआयटी) प्राध्यापक आहेत. क्रेमरही हावर्ड विद्यापीठात अर्थशास्त्रातील प्राध्यापक आहेत. जगातील दारिद्र निर्मुलनासाठी केलेल्या प्रयत्नांसाठी त्यांना हा पुरस्कार देण्यात आला आहे. "बॅनर्जी, डुफ्लो आणि क्रेमर यांनी गेली दोन दशके केलेल्या प्रयोगांमुळे विकासात्मक अर्थव्यवस्थेचा चेहरामोहरा बदलला.", असे मत नोबेल पुरस्कार समितीने व्यक्त केले.


Nobel Prize _1  





वैश्विक दारिद्र्य निर्मुलातील प्रयोगजन्य दृष्टीकोन


@@AUTHORINFO_V1@@