समरसतेचा मंत्र देणारी : ‘जिव्हाळा’

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    11-Dec-2019
Total Views |

jivhala_1  H x


काय आहे या ‘जिव्हाळा’ परिवारात, असा प्रश्न पडणे स्वाभाविक आहे. अतिदुर्गम भागातील निराधार मुलामुलींना शिक्षण, वस्त्र, निवारा, आरोग्य यांची विनामूल्य व्यवस्था करून त्यांना उच्च शिक्षित करण्यापासून स्वतःच्या पायावर उभे राहण्यास समर्थ करण्यापर्यंतची ही ‘जिव्हाळा’ संस्था आहे. स्त्रियांना सन्मान प्रदान करणार्‍या या संस्थेचा परिचय करून देणारा हा लेख...


नागपूरच्या पूर्व भागातील नागरी प्रदेशात ‘जिव्हाळा’ नावाची संस्था कार्यरत असून ती २०१२ मध्ये निर्माण झाली. या संस्थेचे संघचालक नागेशजी पाटील, त्यांच्या पत्नी मीनाताई आणि भगिनी या ‘जिव्हाळा’ परिवाराची काळजी घेतात. ‘जिव्हाळा’ संस्थेत ४५ मुली आणि १५ मुले शिक्षण घेत असून ती विविध वयोगटातील आहे. अत्यंत जिव्हाळ्याने विद्यार्थ्यांना संस्कारक्षम करणारी ही संस्था असल्याने तसेच नागेशजी पाटील अत्यंत मायेने मुलांवर प्रेम करणारे असल्यामुळे सर्व मुलांचे ते ‘पप्पा’ आहेत. ‘६० मुलांचा बाप’ म्हणून नागेशजींची ख्याती असून डॉ. बाबासाहेब आंबेडकराच्या विचारमुल्यांवर या संस्थेची वाटचाल सुरू आहे. ही संस्था तशी ‘वसुंधरा परिवार’अंतर्गत सुरू झाली. परंतु, अत्यंत जिव्हाळ्याने हे समाजसेवेचे, शिक्षणाचे निःस्वार्थ काम करणारी संस्था असल्याने लोकांनीच त्यांना ‘जिव्हाळा’ हे नाव दिले व आजघडीला हेच नाव रूढ आहे.

या नावावर माननीय पूज्य सरसंघचालक डॉ
. मोहनजी भागवत यांनीही शिक्कामोर्तब केले. आदरणीय स्मृतिशेष प्रा. विलास फडणवीस यांसारख्या थोर समाजसुधारकांचे आशीर्वाद, संघवई यांच्यासारखे संस्थापक असल्याने व सामाजिक समरसता तंत्राच्या माध्यमातून समाजसेवेचे संस्कार नागेशजी पाटील यांच्यावर झाल्यामुळे ते हे शिवधनुष्य लिलया पेलू शकतात. येथे इयत्ता पाचवीपासून ते पदव्युत्तरपर्यंत शिकणारे विद्यार्थी आहेत. हे विद्यार्थी अरुणाचल प्रदेशातील दुर्गम भागातले, विदर्भातल्या वाशिम, यवतमाळ जिल्ह्यातील आहे. वर्षातून फक्त एक-दोनदा या आपल्या पालकांना भेटायला जातात. काही पूर्ण वेळ आपल्या शिक्षणाकडे लक्ष देतात. आपल्यावर चांगले संस्कार करून घेण्याचा प्रयत्न करतात.

येथील मुली खरंच गुणी आहेत
. आपापल्या शाळा, महाविद्यालयात शिक्षणाबरोबरच गायन, नृत्य, चित्रकला, नाट्य, क्रीडा या क्षेत्रांमध्येसुद्धा अव्वल असतात. नर्सिंग, पॅथॉलॉजी असे कोर्सेस करून मुली स्वतःच्या पायावर उभ्या आहेत. एक मुलगी तर भरतनाट्यममध्ये उच्चशिक्षित होण्यासाठी तामिळनाडूत राहत असून ही मुलगी आता बंगळुरू येथे शिक्षण घेत आहे. विशेष म्हणजे, यांच्या शिक्षणाची सर्व व्यवस्था ही विनामूल्य आहे. हे करण्यासाठी समाजातील परोपकारी हात पुढे सरसावले आहेत. आज ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’ हा मोदी सरकारने देशभर कार्यक्रम राबवला आहे. हे स्लोगन या ‘जिव्हाळा’ संस्थेतील मुलगी सृष्टी राऊत हिने माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ९ ऑगस्ट, २०१४ मध्ये दिल्लीत त्यांच्या भेटीदरम्यान गाऊन दाखवले आणि सार्‍या देशाचे हे संदेश गीत झाले. आज भारतभर ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’ हा मोलाचा संदेश देणारी हीच ती संस्था ‘जिव्हाळा’!


या संस्थेचे सकारात्मक कार्य सर्वदूर पसरत असल्यामुळे भारतातील अनेक समाजसेवी संस्थांनी अनेक मानसन्मानांनी व पुरस्कारांनी या संस्थेस गौरविले आहे
. असे आजपर्यंत ४० पुरस्कार प्राप्त झाले असून अजूनही पुरस्कार प्राप्त होत आहेत. त्यातील काहींचा उल्लेख करणे जरुरीचे आहे.

) महाराष्ट्र शासनाचा (१९१५) डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार, मुंबई

) विश्वनायक प्रेरणा पुरस्कार, नेहरू युवाकेंद्र, मुंबई

) जिव्हाळा पुरस्कार, गोवा

) जिव्हाळा पुरस्कार, पुणे

) विदर्भभूषण अ‍ॅवॉर्ड, नागपूर

) नागभूषण पुरस्कार, नागपूर

) सेवाभावी पुरस्कार, नागपूर

) प्रेरणापुंज पुरस्कार, विदर्भ हिंदी साहित्य संमेलन, नागपूर

अशी ही सेवाभावी संस्था स्त्री उत्थानासाठी कार्य करते आहे, ती भाड्याने घेतलेल्या फ्लॅट्समध्ये. मुलामुलींसाठी वेगवेगळे राहण्याची व्यवस्था केलेली असून त्यांच्यासाठी वॉर्डनची व्यवस्था केलेली आहे. हे वॉर्डन म्हणजे त्या मुलामुलींचे मायबापच! यांच्यावर स्वावलंबनाचे संस्कार करण्याच्या उद्देशाने सर्व मुले, मुली स्वतःची कामे स्वतःच करतात. अनेकांना सहकार्य व मार्गदर्शन करणे या आणि अशा अनेक गोष्टी ही मुले-मुली करतात. अर्थात, हे करण्यामागे नागेशजी पाटील यांचा स्नेह आणि सहकार्य कारणीभूत आहेत.

मुलांकरिता इथे अनेक विषयाच्या शिकवण्या
, कलात्मक व कौशल्यपूर्ण शिक्षण, वक्तृत्व, अभिनय, गायन, वादन, नृत्य असे अभ्यासपूर्ण कार्यक्रम राबवले जातात. त्यासाठी अनेक आंतरशालेय, आंतरमहाविद्यालयीन स्पर्धांमध्ये मुले सहभागी होतात आणि अव्वलही येतात. या ‘जिव्हाळ्या’चे विद्यार्थी स्वकष्टाने पुढे आहेत. यासोबत आयपीएस, आयएएस अशा उच्चश्रेणीच्या पदव्यांचा अभ्यास करण्यासाठी त्यांच्याशी निगडित, ग्रंथसंपदा व मार्गदर्शन वर्गांची व्यवस्था ‘जिव्हाळा’ संस्थेने करून दिलेली आहे. 


अर्थात
, हे सर्व करण्यासाठी सहृदय मनाच्या माणसाचा सहकार्याचा हात कारणीभूत आहे. आज येथील विद्यार्थी सुवर्णपदक मिळवतात. तेव्हा ते नागेशजी त्यांच्याप्रति आपली कृतज्ञता व्यक्त करतात. तेव्हा संबंधित मुले आणि नागेशजी डोळ्यांतील आनंदाश्रूंना वाट मोकळी करून पुढच्या यशाची पायरी चढण्यास बळ प्राप्त करतात. भारतातील अनेक सहलींची ठिकाणं, ऐतिहासिक स्थळं, नामांकित शिक्षण संस्था, निसर्गरम्य स्थानं या आनंद, मनोरंजन आणि शिक्षण, पर्यावरण, विज्ञान, इतिहास, भूगोल, लोकजीवन, लोकसमूह यांचे दर्शन या विद्यार्थ्यांना ही संस्था घडवत असल्याने चौफेर व चौकस ज्ञानप्राप्तीची ही ‘जिव्हाळा’ संस्था मुलांना संधी उपलब्ध करून देते. अर्थात, हेही सारं समाजाच्या सहकार्यानेच!

प्रश्न निर्माण होतो की
, येथे विद्यार्थीसंख्या आजही वाढत आहे. याचे कारण असे की, इथून मुले-मुली आपापल्या गावी जातात. तिथे तिथे नागेशजी त्यांच्या पालकांना भेटतात. आदरपूर्वक त्यांचा सन्मान होतो. ज्या घरात गावात जाण्यासाठी साधे रस्ते नाहीत, तिथे प्रगतीचा रस्ता जात आहे. एक आशेचा किरण एक ना एक दिवस उजाडणार आहे. याचा आत्मविश्वास त्या पालकांना येतो. आपली मुलं उच्च शिक्षण घेत असल्याचे पाहून त्यांना धन्य वाटते आणि न कळून ‘जिव्हाळ्या’ला सक्षम करण्यासाठी त्यांचे हात उंचावतात.

पूर्वांचलातील दुर्गम भागातील विद्यार्थी हे सगळेच बौद्ध आहेत
. परंतु, त्यांचा डॉ. बाबासाहेबांशी वैचारिक संबंध कधी आलाच नाही. भारतीय संस्कृतीचा संस्कार तिथपर्यंत पोहोचलाच नाही. उलट ख्रिस्ती मिशनरीजनी ख्रिश्चन धर्माची दीक्षा देण्याचे काम तिथे आरंभल्याने अनेक अडचणी निर्माण झाल्या. परंतु, ‘जिव्हाळा’ संस्थेने त्यांना बौद्ध धर्म, हिंदू धर्म आणि आंबेडकरी विचार यांचा परिचय करून दिला. एक प्रकारे धर्मरक्षणाचेच कार्य ‘जिव्हाळा’ संस्था करीत आहे. त्या संस्थेत सकाळची सुरूवात प्रार्थनेने होत असून संध्याकाळही प्रार्थनेनेच होते. सर्व भाषांमध्ये हिंदी, मराठी, इंग्रजी, पाली, संस्कृत, प्रार्थना घेतल्या जातात. एक सुसंस्कृत भारतीय नागरिक तयार करण्याचे हे एक उत्तम केंद्र झाले आहे. ही एक आजच्या काळाची गरज आहे. नागेशजी पाटील ‘जिव्हाळा’अंतर्गत समाजासाठी काम करतात. वर्षाचा ३०-३५ लाखांचा खर्च लोकसहभागातून उभा करतात. एक पारदर्शक कारभार लक्ष देऊन करतात. त्यांना ही संस्था उत्तरोत्तर पुढे जाण्यासाठी आणखी मदतीचे हात पुढे यावेत, ही आशा करतो. कारण, समरसतेचा मंत्र देणारी ‘जिव्हाळा’ परिवार संस्था आहे.

- डॉ. ईश्वर नंदापुरे

@@AUTHORINFO_V1@@