होय मी फिक्सिंग केली : 'या' पाकिस्तानी क्रिकेटपटूची कबुली

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    10-Dec-2019
Total Views |

hfc_1  H x W: 0

 


नवी दिल्ली : पाकिस्तान आणि क्रिकेट फिक्सिंग हे नाते संपूर्ण जगाला काही नवीन नाही. अनेकवेळा पीसीबी आणि पाकिस्तानी क्रिकेटपटुंवर स्पॉट फिक्सिंग आणि मॅच फिक्सिंगचे आरोप होत आले आहेत. अशामध्ये नुकतेच पाकिस्तान संघाचा माजी सलामीवीर नासीर जमशेदने पाकिस्तान सुपर लिग स्पर्धेच्या (पीएसएल) २०१६-१७ हंगामात स्पॉट फिक्सींग केल्याची कबुली दिली आहे. यामुळे पुन्हा एकदा पाकिस्तानी क्रिकेटवर फिक्सिंगचा डाग लागला आहे.

 

इंग्लंडमधील मँचेस्टर क्राऊन न्यायालयात नासीरने आपल्यावरील आरोप मान्य केले. नासीरवर २०१८ मध्ये त्याला १० वर्षांच्या बंदीची शिक्षा सुनावण्यात आली होती. तो पीएसएल स्पॉट फिक्सिंग प्रकरणात सहकारी क्रिकेटपटूंना लाच देण्याच्या प्रकरणात दोषी आढळला होता. नासीर व्यतिरिक्त युसूफ अन्वर आणि मोहम्मद एजाज या अन्य दोन जणांनी पीएसएल खेळाडूंना लाच दिल्याची कबुली दिली आहे. या तिघांच्या शिक्षेचा निर्णय फेब्रुवारीमध्ये होणार आहे.

 

काय आहे प्रकरण?

 

२०१६ मध्ये झालेल्या 'बांगलादेश प्रीमियर लीग'मध्ये फिक्सींगचा प्रयत्न करण्यात आला होता. तर, पीएसएल २०१७ मध्ये सामने निश्चित केले गेले होते. या दोन्ही प्रकरणांमध्ये नासीरने एका षटकातील पहिल्या दोन चेंडूंवर धावा न करण्यासाठी पैसे घेतले होते, असे तपासादरम्यान पोलिसांना आढळले. नासीरने ९ फेब्रुवारीला दुबईच्या इस्लामाबाद युनायटेड आणि पेशावर झल्मी यांच्यात झालेल्या सामन्यादरम्यान फिक्सींगसाठी खेळाडूंना भडकवले होते. नासीरने आपल्या कारकिर्दीत ४८ एकदिवसीय, १८ टी-२० आणि २ कसोटी सामन्यांमध्ये पाकिस्तानचे प्रतिनिधीत्व केले आहे.

@@AUTHORINFO_V1@@