चक दे इंडिया ! भारतीय महिला फुटबॉल संघाने मारली सुवर्ण हॅट्ट्रिक

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    10-Dec-2019
Total Views |


saf_1  H x W: 0


काठमांडू : नेपाळमध्ये चालू असलेल्या १३व्या दक्षिण आशियाई क्रीडा स्पर्धेमध्ये भारतीय महिला फुटबॉल संघाने सलग तिसऱ्यांदा सुवर्ण पदकाची कमाई केली आहे. अंतिम सामन्यामध्ये यजमान नेपाळला २-० असे हरवून भारतीय संघाने सुवर्ण पदक पटकावले आहे. या विजयामध्ये स्ट्रायकर बाला देवीने आपले कौशल्य दाखवत पहिल्या आणि दुसऱ्या सत्रामध्ये १-१ गोल केला आणि भारताला विजय मिळवून देण्यात मोलाचे सहकार्य केले.

 

बाला देवी या मणिपूरच्या २९ वर्षीय स्ट्राईकरने पूर्ण स्पर्धेमध्ये चांगली कामगिरी केली. त्यांनी ४ सामन्यांमध्ये ५ गोल केले आहेत. तसेच, अंतिम सामन्यामध्ये गोलकिपर अदिती चोहाननेदेखील चांगली कामगिरी करत प्रतिस्पर्ध्यांना गोल करून दिले नाही. त्यामुळे त्यांच्या या सांघिक कामगिरीमुळे भारतने नेपाळवार २-० अशी मात करत सलग तिसऱ्यांदा सुवर्ण पदक जिंकले आहे.

@@AUTHORINFO_V1@@