लग्नानंतर पहिल्यांदाच दीपिका म्हणतेय, ‘अब लडना है!’

    10-Dec-2019
Total Views |

dee_1  H x W: 0


अब लडना है!’ असं म्हणत, दीपिका पदुकोणच्या बहुप्रतिक्षित छपाक या चित्रपटाचा ट्रेलर मंगळवारी प्रदर्शित करण्यात आला. पोस्टर प्रदर्शित झाल्यानंतर सगळ्या प्रेक्षकांचे लक्ष या ट्रेलरकडे लागले होते. या चित्रपटात दीपिकाने अॅसीड हल्ला पीडिता लक्ष्मी अग्रवालची भूमिका साकारली आहे. मेघना गुलझार दिग्दर्शित या चित्रपटात दीपिका मालती बनून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.



२००५ मध्ये दिल्लीच्या रस्त्यावर लक्ष्मीवर अॅसिड हल्ला करण्यात आला होता. या हल्ल्याने तिचे संपूर्ण आयुष्य बदलून गेले. चेहऱ्याची झालेली दयनिय अवस्था पाहून हतबल झालेल्या तिने धीराने उभी राहून स्वतःच्या न्यायासाठी लढा दिला. अॅसीड विकण्यास बंदी यावी म्हणून तिने प्रयत्न केले. तिच्या याच असामान्य लढ्यावर ‘छपाक’ या चित्रपटाची कथा बेतली आहे.

हा चित्रपट दीपिकासाठी खूप खास असणार आहे. लग्नानंतरचा दीपिकाचा हा पहिलाच चित्रपट आणि यातून ती निर्मिती क्षेत्रात पाऊल टाकते आहे. मेघना गुलजार दिग्दर्शित या चित्रपटात दीपिकासह अभिनेता विक्रांत मेस्सी मुख्य भूमिकेत दिसणार आहे.