जगभरातील हिंदूंसाठी भारत आपले घर :चेतन भगत

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    10-Dec-2019
Total Views |


chetan_1  H x W



नवी दिल्ली : आठ तासांच्या चर्चेनंतर नागरिकत्व दुरुस्ती विधेयक सोमवारी मध्यरात्री लोकसभेत मंजूर झाले. आज हे विधेयक राज्यसभेत सादर करण्यात येणार आहे. तत्पूर्वीच या विधेयकावरून संपूर्ण जगभरातून संमिश्र प्रतिक्रिया येत आहेत. लोकसभेत हे विधेयक मंजूर झाल्यानंतर तरुणाईत नामांकित असणारा लेखक चेतन भगत याने ट्विट करत या विधेयकास आपले समर्थन दर्शविले. तो आपल्या ट्विट मध्ये म्हणतो कि, संपूर्ण जगभरात असलेल्या हिंदूंसाठी भारत आपले घर आहे. त्याच्या या ट्विटची नेटकऱ्यांमध्ये आज चर्चा आहे.


 


चेतन भगत यांनी मंगळवारी सकाळी ट्विट केले
, “जगात कोठेही हिंदूंना आपल्या धर्मासाठी दडपशाही सहन करावी लागली तर त्यांनी भारताला आपले घर मानावे . भारत या महान धर्माचे घर आहे आणि ते नेहमीच त्याचे संरक्षण करेल.चेतनच्या या ट्विटचे काही नेटकऱ्यांनी स्वागत केले तर काहींनी मात्र त्याला टीकेचे धनी बनवले.

@@AUTHORINFO_V1@@