आम्ही पुन्हा आलो...

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    01-Dec-2019   
Total Views |





या सरकारचे पाय म्हणजे सरकारचे स्वरूपही असेच पहिल्या एक दोन दिवसातच दिसले. नवनिर्वाचित मुख्यमंत्री भांबावलेले आणि त्यांना कायम धाक देण्यासाठी की काय, त्यांच्या एका बाजूला जयंत पाटील, अजित पवार किंवा छगन भुजबळ बसलेले. या सगळ्यांच्या गदारोळात ‘मुख्यमंत्री हैं कहाँ? आ गये हम’च्या आविर्भावात. ते असे का गोंधळलेले बरं?



पुन्हा आलो
... मी पुन्हा आलो... महाराष्ट्र सदन घोटाळा करायला! मी पुन्हा आलो... मी पुन्हा आलो... आदर्श घोटाळा करायला! मी पुन्हा आलो... मी पुन्हा आलो... सगळ्यांच्या पाठीत खंजीर खुपसायला! मी पुन्हा आलो... हुश्श... सगळेच जण पुन्हा आले. आता लोक म्हणतात की, ज्यांना लोकांना पुन्हा आणायचे होते ते तर साधेभोळे नीतिमत्तेच्या कल्पनेत राहिले आणि खर्‍या अर्थाने सत्तेत येऊनही सत्तेत आले नाहीत. मात्र, ज्यांना कधीच पुन्हा आणायचे नव्हते ते मात्र पुन्हा आले. आता आले तर आले आणि अशा आविर्भावात आले की ज्याचे नाव ते. म्हणतात ना ‘बाळाचे पाय पाळण्यात दिसतात.’ तर या सरकारचे पाय म्हणजे सरकारचे स्वरूपही असेच पहिल्या एक दोन दिवसातच दिसले. नवनिर्वाचित मुख्यमंत्री भांबावलेले आणि त्यांना कायम धाक देण्यासाठी की काय, त्यांच्या एका बाजूला जयंत पाटील, अजित पवार किंवा छगन भुजबळ बसलेले. या सगळ्यांच्या गदारोळात ‘मुख्यमंत्री हैं कहाँ? आ गये हम’च्या आविर्भावात. ते असे का गोंधळलेले बरं?



यावर काही लोकांचे म्हणणे
, संजयच्या दूरदृष्टीचा वापर पवार आणि गांधी कुटुंबीयांनी करून घेतला. आता दूरदृष्टीला करण्यासारखे काहीच नाही. त्यामुळे आता त्या दूरदृष्टीशिवाय इथे राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या पहार्‍यात बसावे लागते. त्यामुळे कोंडून राहिल्यासारखे वाटत असावे. त्यातही आजूबाजूला जे मान्यवर बसले आहेत त्यांच्याकडे पाहून मुख्यमंत्र्यांना ‘भूली बिसरी यादे’ येतच असतील. यावर काही लोकांचे म्हणणे ‘छे, इतकी संवेदनशीलता जर त्यांना असती तर सत्तेचा बाजार मांडण्यासाठी त्यांनी कालपर्यंतच्या विरोधकांशी हातमिळवणी केलीच नसती.’ पाच वर्षे सत्तेत राहून मित्राला मुद्दाम त्रास देऊन, वर शेवटपर्यंत राजीनामे खिशात ठेवण्याचा प्रपंच करणारे संवेदनशील असतात का? असो. कुणी काहीही म्हणो, जे झाले ते झाले. पण जे झाले त्याने जे झाले आहे त्याची प्रचिती पहिल्या दिवसापासून महाराष्ट्र घेत आहे. ‘महाशिवआघाडी’चे ‘महाविकासआघाडी’मध्ये रूपांतर होणे. असू दे की, कालपर्यंत ज्यांना मनमुराद शिव्याशाप दिले त्यांच्या मांडीला मांडी लावून बसणे. सगळीच कुचंबणा सुरू आहे. नेत्यांचीही आणि नेत्यांसाठी ‘आवाज कुणाचा’ म्हणणार्‍यांचीही.



हा सुसंस्कृत महाराष्ट्र आहे
!



हिंदी चित्रपटांमध्ये बहुतेक वेळा असे कथानक असते की
, बहुमूल्य खजाना लुटण्यासाठी दोन-तीन चोर किंवा चोरांचा जत्था एकत्र येतो. या चोरांचे एकमेकांशी अजिबात पटत नाही. एकमेकांवर पाळत ठेवणे, एकमेकांचा काटा काढणे, एकमेकांना फसवणे अशा नाना कुरापती करत हे चोर फक्त खजाना लुटण्यासाठी एकत्र राहतात. खजाना लुटण्याचा मनसुबा रचतात. मात्र, खजाना लुटू शकत नाहीत. कारण, खजान्याचे रक्षण करण्यासाठी जीवाची बाजी लावून नायक तिथे उपस्थित राहतो. या अशा कथानकाभोवती कितीतरी लोकप्रिय चित्रपट निर्माण झाले. या चित्रपटांचा प्रभाव इतका मोठा की, राजकारणीही या चित्रपटाचा रिमेक खर्‍या राजकारणात करू लागले. कारण, सत्ता असली की मज्जाच मज्जा. सत्ता, स्वार्थ, संपत्ती यांची गणिते आपोआप जुळून येतात. त्यामुळे आज राजकारणात चोर आणि खजाना लुटण्याचे कथानक जीवंत होताना दिसत आहे. आता या वक्तव्यावर कित्येकांच्या मुठीही आवळल्या जातील. पण जे सत्य आहे ते सत्य आहे.



राजकारण हे समाजकारणासाठी करावे
, असे गृहितक आहे. मात्र, गृहितक रद्दीच्या पेपरात जावे तसे सध्या झाले आहे. बरे, सत्ता मिळाल्यावर ती संपादन करताना नम्रता तरी बाळगावी, तर त्याचीही वानवा. सत्तासंपादनातला महत्त्वाचा मोहरा असलेले जयंत पाटील यांचे वक्तव्यच पाहा. वयाने ज्येष्ठ आणि माजी विधानसभा अध्यक्ष असलेल्या हरीभाऊ बागडेंबद्दल ते म्हणाले, “हरीभाऊंनी डाव्या बाजूला बसणार्‍यांना न्याय दिला नाही. डाव्या बाजूला बसणार्‍यांचा आवाज हरीभाऊंना ऐकू आला नाही.” जयंत पाटील म्हणाले, “कारण, हरीभाऊ बागडेंना डाव्या कानाने ऐकू येत नाही.” त्यांच्या या शारीरिक व्यंगावर जयंत पाटलांनी निर्लज्जपणे कोटी केली. आणीबाणीच्या काळातल्या काँग्रेस सरकारच्या निर्दयी नीतीमुळे हरीभाऊंना डाव्या कानाला दुखापत झाली. त्यामुळे त्यांचा डावा कान कायमचा निकामी झाला. मात्र, त्यांच्या या शारीरिक दुर्बलतेवर टीका करण्याचा आसुरी आनंद मात्र राष्ट्रवादी पक्षाच्या जयंत पाटलांना झाला. असल्या राजकारण्यांच्या हातात महाराष्ट्राचा ताबा? मात्र, हा सुसंस्कृत महाराष्ट्र आहे. माजलेल्या राजकीय पक्षांच्या दिवाळखोर विचारांचा तबेला नाही, हे नेत्यांनी समजून घ्यावे.

@@AUTHORINFO_V1@@