वादग्रस्त जमीन रामलल्लाचीच - सर्वोच्च न्यायालय

    09-Nov-2019
Total Views |

   



मुंबई :  अयोध्या प्रकरणाबाबत आज सर्वोच्च न्यायालयात अंतिम सुनावणी सुरू असताना बाबरी ढाचा ज्या जागेवर बांधला गेला ती जागा रिकामी नव्हती, असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे. तसेच वादग्रस्त जागा रामलल्लाचीच होती, असा महत्वपूर्ण निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. वादग्रस्त जागेवर ढाचा बांधण्यापूर्वी त्या जागेवर एक वास्तू होती आणि ती इस्लामिक नव्हती, असेही सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले आहे.
 

 

अयोध्येच्या वादग्रस्त जागेबाबत सर्वोच्च न्यायालयातील एक एक युक्तीवाद समोर येत आहेत. बाबरीचा ढाचा असलेल्या ठिकाणी पूर्वी एक वास्तू होती, असे न्यायालयाने म्हटले आहे. ती रिकामी जागेवर बांधण्यात आली नव्हती, असेही न्यायालयाने स्पष्ट केले आहे. बाबरीच्या जागेवर भारतीय पुरातत्व विभागाने उत्खनन करुन अहवाल सादर केला होता. या अहवालात बाबरीचा खाली एक वास्तू असल्याचे म्हटले होते. या वास्तूचे अवशेष इस्लामिक वास्तूरचनेशी मिळतेजुळते नव्हते. तर ते मंदिरासाठी वापरण्यात येणाऱ्या अवशेषांसारखे वाटत असल्याचे नमूद केले होते. २००३ साली पुरातत्व उत्खनन करून सादर केलेल्या या अहवालावर मुस्लिम पक्षकारांनी आक्षेप घेतला होता. सर्वोच्च न्यायालयाने हा आक्षेप ग्राह्य धरला नाही आहे.