रामजन्मभूमी उत्खननातील तथ्ये आणि निष्कर्ष

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    09-Nov-2019
Total Views |





विसाव्या शतकाच्या उत्तरार्धात भारतात
‘एएसआय’ने असे काही प्रकल्प हाती घेतले. १९५५ मध्ये बी. बी. लाल यांनी महाभारतात वर्णन केलेल्या नगरींचे उत्खनन केले. हस्तिनापूर, इंद्रपत, सोनपत, पानिपत, तिलपत, बघपत आदी अनेक ठिकाणी उत्खनन केले गेले. या उत्खानातून इ. स. पूर्व १३०० मधील मानवी संस्कृतीच्या खुणा मिळाल्या. राखाडी रंगाच्या खापरांवर काळ्या रंगाने रंगवलेली भांडी, (PGW Painted Grey Ware) तसेच लोहापासून तयार केलेल्या अनेक वस्तू मिळाल्या.




ग्रीक कवी होमरचे अजरामर महाकाव्य आहे
‘इलियाड.’ या कथेच्या सुरुवातीला ट्रोयचा राजपुत्र पॅरिस हा मेनेलियसची पत्नी हेलेनचे अपहरण करतो. त्यावर ग्रीक राजा मेनेलियस ट्रोयवर हल्ला करतो. हे युद्ध दहा वर्ष चालते. शेवटी एका बनावट घोड्यात सैन्य लपवून पाठवले जाते व ट्रोयचा पडाव होतो. होमरची कथा ‘काल्पनिक’ आहे, असे इतिहासकारांचे मत होते. मात्र, लोकांमध्ये अशी मान्यता होती की, होमरने एक प्राचीन ऐतिहासिक घटना, जी मौखिक परंपरांनी जपली होती ती लिहून काढली. १८७० मध्ये हेन्री श्लीमन (Henry Schliemann) यांनी होमरने वर्णन केलेली ‘ट्रोय’ कुठे असेल याचा शोध घेतला. तुर्कीस्तानच्या पश्चिमेला त्या नगरीचे अवशेष त्यांना सापडले. एका खाली एक असे इस पूर्व ३००० पर्यंत जाणारे नऊ थर मिळाले. या उत्खननानंतर होमरने वर्णन केलेले युद्ध कदाचित इ.स. पूर्व १३००च्या आसपासचे घडले असावे, असे आता मानले जाते. ट्रोयच्या यशापाठोपाठ बायबलमध्ये वर्णन केलेल्या गावांचे उत्खनन करण्यास सुरुवात झाली. या उत्खननातून इजिप्त, जोर्डन, इस्रायल, इराक, तुर्कस्तान आदी भागांमध्ये उत्खनन केले गेले. यामधून अनेक प्राचीन गावे, राजे, साम्राज्ये समोर आली. यामधून बायबलमधील काही कथांना दुजोरा मिळाला, तर काही खोडल्या गेल्या. अशा प्रकारे विसाव्या शतकाच्या आधी, प्राचीन साहित्यावर आधारित असे उत्खनन युरोपियन लोकांनी केले होते. त्यामधून साहित्याला पूरक असे काही पुरावे मिळाले होते. या उत्खाननांमुळे प्राचीन साहित्य म्हणजे मिथक असते, इथपासून प्राचीन साहित्यात थोडेफार तथ्य असू शकते इथपर्यंत प्रवास झाला.



विसाव्या शतकाच्या उत्तरार्धात भारतात
‘एएसआय’ने असे काही प्रकल्प हाती घेतले. १९५५ मध्ये बी. बी. लाल यांनी महाभारतात वर्णन केलेल्या नगरींचे उत्खनन केले. हस्तिनापूर, इंद्रपत, सोनपत, पानिपत, तिलपत, बघपत आदी अनेक ठिकाणी उत्खनन केले गेले. या उत्खानातून इ. स. पूर्व १३०० मधील मानवी संस्कृतीच्या खुणा मिळाल्या. राखाडी रंगाच्या खापरांवर काळ्या रंगाने रंगवलेली भांडी, (PGW Painted Grey Ware) तसेच लोहापासून तयार केलेल्या अनेक वस्तू मिळाल्या. जसे बाणांचे अग्र, भाल्यांचे अग्र आदी. हाडांपासून तयार केलेले द्यूतात वापरले जाणारे फासेसुद्धा मिळाले. १९६० मध्ये ‘एएसआय’च्या डॉ. एस. आर. राव यांनी समुद्रात बुडलेली द्वारका नगरी शोधली. या ठिकाणी केलेल्या उत्खननातून त्या नगरीचे प्राचीन अवशेष मिळाले. महाभारतात वर्णन केल्याप्रमाणे, द्वारका नगरी समुद्रात बुडाली होती हे या शोधातून पुढे आले व महाभारत ही कविकल्पना नसून त्यामध्ये थोडेफार तरी तथ्य आहे हे मान्य केले गेले.



१९७५ मध्ये बी
. बी. लाल यांनी रामायणाशी संलग्न असलेल्या गावांचे उत्खनन करण्याचा प्रकल्प हाती घेतला. या वेळी अयोध्या, नंदीग्राम, शृंगवेरपूर, भारद्वाज आश्रम व चित्रकुट या ठिकाणी उत्खनन करण्यात आले. अयोध्येत बाबरी मशीद परिसरात उत्खनन केले गेले. राम वनवासात असताना भरत नंदीग्राम येथे राहिला होता. तिथे उत्खनन केले. शृंगवेरपूर येथे रामाने वनवासात जाताना गंगा नदी ओलांडली होती. इथे निषादराज गुहाने त्यांना आपल्या होडीतून गंगापार नेले होते. इथून पुढे राम, लक्ष्मण व सीता भारद्वाज आश्रमात गेले होते. भारद्वाज मुनींनी त्यांना चित्रकुटची माहिती दिली व तिथे जाण्याचा रस्ता सांगितला होता आणि नंतर राम, लक्ष्मण व सीता मंदाकिनी नदीच्या तीरावर असलेल्या चित्रकुट येथे गेले होते. या सर्व ठिकाणी इ. स. पूर्व दुसर्‍या सहस्रकातील मानवी संस्कृतीचे अवशेष मिळाले. विशेष उल्लेखनीय आहे, शृंगवेरपूर येथे पाणी साठवण्यासाठी बांधलेला मोठा हौद. गंगा नदीच्या काठावर शृंगवेरपूर वसलेले आहे. गंगेच्या पुराचे पाणी वाहून नेण्यासाठी येथे ११ मीटर रूंद व ५ मीटर खोल इतका मोठा, विटांनी बांधलेला कॅनाल मिळाला. या मधून वेगवेगळ्या टाक्यांमध्ये गाळ साचू देत स्वच्छ पाणी एका मोठ्या हौदाकडे वळवले आहे. २० लाख लिटर पाणी साठवण्याची क्षमता असलेला हा हौद आहे.




बी
. बी. लाल यांनी अयोध्येमध्ये १४ ठिकाणी उत्खनन केले. जन्मभूमीजवळच असलेल्या हनुमान गढी येथेदेखील उत्खनन केले गेले. बाबरी ढाँचाच्याच्या आतमधूनदेखील पाहणी केली गेली. या उत्खननाची माहिती पुढील प्रमाणे-

- ढाँचाला लागून दक्षिणेला व पश्चिमेला उत्खनन केले गेले.

- यामध्ये अनेक थर मिळाले. सर्वात वरचा मध्य युगातील साधारण इ. स. १५००च्या आसपासचा. त्याखाली गुप्तकालीन थर. त्याच्या खाली कुशाण काळातील थर. त्याच्याही खाली शुंग काळातील थर. त्या खाली मौर्य काळातील थर व सर्वात खाली ‘एनबीपीडब्ल्यू’ (छेीींहशीप इश्ररलज्ञ झेश्रळीहशव थरीश) संस्कृतीचा थर.

- इ. स. १५०० चा थर हा मंदिर तोडलेल्या काळातला आहे.

- इथे १४ स्तंभांच्या पायाचे अवशेष मिळाले आहेत. हे सर्व विटांनी बांधलेले होते.

- यावर मंदिराचे पाषाणाचे स्तंभ उभे केले गेले असावेत.

- ‘कसौटी’ पाषाणाचे १२ स्तंभ बाबरी ढाँचामध्ये वापरले होते. दोन स्तंभ जवळच असलेल्या एका मकबर्‍यात वापरले आहेत. या स्तंभांवर पूर्ण कलशाचे शिल्प कोरले आहे.

- पूर्णकलश (पाण्याचा कलश व त्यामधून बाहेर येणारी पाने) हे ‘अष्टमंगलचिन्हां’पैकी एक आहे. कोणत्याही पूजेसाठी कलशाची स्थापना केली जाते. पूर्वी स्वागत करताना कलश दिला जात असे. राम जेव्हा वनवासातून परत आला तेव्हा त्याचे स्वागत कलश देऊन केले होते, असा उल्लेख रामायणात आहे. असे पूर्णकलशाचे शिल्प असलेले स्तंभ ढाँचामध्ये होते.

- दोन स्तंभांवर हातात त्रिशूल घेतलेल्या द्वारपालांचे शिल्प आहे. या स्तंभांमधील अंतर व उत्खननात मिळालेल्या स्तंभाच्या पायांमधील अंतर एकच आहे. पाषाणाच्या स्तंभाचा पाया उत्खननात मिळालेल्या स्तंभाच्या पायाच्या आकारापेक्षा थोडा लहान आहे. यावरून मंदिराचे स्तंभ या पायांवरच उभे होते हे कळते.

- या स्तंभांवरील नक्षीकामावरून ते अकराव्या शतकातील कलेशी मिळते जुळते आहे हे दिसते.

- हे सर्व स्तंभ उत्तर-दक्षिण व पूर्व-पश्चिम दिशेने काटेकोरपणे बांधले आहेत.

- या मंदिराचे मुख पूर्व दिशेला होते.

- ढाँचाच्या मागे साधारण ४० फूट खोल असा ‘चॅनेल’ आहे. हा शरयू नदीचा प्राचीन ‘चॅनेल’ असावा.



१९७५ मध्ये सुरू केलेल्या पहिल्या उत्खननातून अगदी स्पष्टपणे प्राचीन राम मंदिराचे पुरावे समोर आले होते
. या पुराव्यांवरून १९८०च्या दशकात रामजन्मभूमीचा प्रश्न सुटला असता. पण, काही इतिहासकारांनी समोर असलेले धडधडीत पुरावे मान्य केले नाहीत. त्यातून हा प्रश्न चिघळला आणि शेवटी १९९२ मध्ये ढाँचा पाडला गेला. त्यानंतर २००३ मध्ये इलाहाबाद उच्च न्यायालयाने ‘एएसआय’ला जन्मभूमी स्थानावर उत्खनन करण्याचे आदेश दिले. हे आदेश अतिशय कठोर होते. उत्खननाच्या प्रत्येक दिवशी ‘बाबरी मशीद अ‍ॅक्शन कमिटी’ चा एक सदस्य आणि रामजन्मभूमी गटाचा एक सदस्य उपस्थित असायला हवा. रोज उत्खननात ज्या ज्या वस्तू मिळतील, त्याची ‘एन्ट्री’ एका रजिस्टरमध्ये केली जावी व त्यावर दोन्ही पार्टीच्या सदस्यांनी सही करावी, असे आदेश दिले होते.



अशा प्रकारे दुसरे उत्खनन ढाँचाच्या खाली सुरू झाले
. या वेळी ‘एएसआय’चे बी. आर. मणी यांनी उत्खनन केले. या वेळी मिळालेल्या वस्तू अशा-

- इ. स. पूर्व दुसर्‍या सहस्रकापासून या ठिकाणी मानवी संस्कृतीचे अवशेष मिळाले.

- हे अवशेष घरांचे/रस्त्यांचे नसून प्रत्येक थरातील अवशेष हे एका पूजनीय स्थानाचे होते.

- गुप्तोत्तर काळात येथे एक गोलाकार मंदिर होते.

- अभिषेकाचे पाणी वाहून नेण्याकरिता बांधलेली मकरप्रणाली येथे मिळाली. अशी वस्तू केवळ मंदिरातच असल्याने प्राचीन मंदिराचे अस्तित्व अधोरेखित झाले.

- दहाव्या शतकात येथे एक मंदिर होते. मात्र, ते मंदिर फार काळ टिकले नव्हते. कदाचित ते मंदिर तुर्कांनी पाडले असावे. (११ व्या शतकाच्या सुरुवातीला महंमद गझनीने सोमनाथ पाडले होते. तसेच मथुरेवर स्वारी करून तेथील मंदिरांवर हल्ला केला होता.)

- बाराव्या शतकात याच ठिकाणी एक भव्य मंदिर बांधले होते. (सोमनाथचे मंदिरसुद्धा पुनश्च बांधले गेले होते.)

- या मंदिराच्या ५० स्तंभांचा पाया मिळाला आहे.

- मंदिरांच्या शिखरावर असलेले ‘अमलक’ मिळाले आहेत. (नागर मंदिरांच्या शिखरावर अवळ्यासारखा दिसणारा चपटा गोल डेकोरेटीव्ह दगड.)

- अनेक मातीच्या मूर्ती मिळाल्या आहेत. त्यामध्ये मानवी आकृती आहेत. प्राण्यांच्या आकृती आहेत. या मातीच्या मूर्ती - शुंग व गुप्त काळातील आहेत. मातीच्या मूर्तीची पूजा करणे व नंतर त्या मूर्तीचे विसर्जन करणे आजही हिंदू धर्मात पाहतोच.

- बाबरी ढाँचाला पाया वेगळा खणला नव्हता. जुन्या मंदिराच्या भिंतींवर नवीन भिंती बांधल्या होत्या.

- सर्वात महत्त्वाचा असा एक शिलालेख मिळाला. ५ फूट रूंद व २ फूट उंच असा मोठा शिलालेख बाबरी ढाँचा पाडला, त्या ढिगार्‍यात मिळाला. बाबरी ढाँचाच्या एका भिंतीत ती शिला वापरली गेली होती, जी भिंत पडल्यावर बाहेर आली. हा लेख ‘विष्णू-हरि लेख’ या नावाने ओळखला जातो. सुरुवातीला मार्क्सिस्ट इतिहासकारांनी ही शिला नव्याने कोरून इथे ठेवली आहे, असा निराधार आरोप केला. नंतर पवित्रा बदलून ती शिला लखनौ संग्रहालयातून चोरून आणून इथे ठेवली आहे, असाही आरोप केला. मात्र, लखनौ संग्रहालयाने त्यांच्याकडे असलेल्या त्रेता-के-ठाकूर येथील शिलालेख त्यांच्याकडेच असल्याचा निर्वाळा दिला. एकूण हा शिलालेख अग्निदिव्यातून पार पडून शुद्ध असल्याचा निर्वाळा मिळाला. हा लेख २० ओळींचा असून त्यावर लिहिले आहे -

- ‘नम: शिवाय’ या मंत्राने शंकराला नमन करून लेखाची सुरुवात होते.

- गढवाल राजा गोविंदचंद्र याचा अंकित असलेल्या अनयचंद्र नावाच्या राजाने हे मंदिर बांधले आहे.

- ‘विष्णू-हरि’चे हे मंदिर आहे. हे मंदिर ज्याने अप्रतिम-विक्रम केला त्या (रामा) चे आहे. ज्याने दहा शीर असलेल्या राक्षसाला मारले त्याचे हे मंदिर आहे.

- या मंदिराला सोन्याचा कळस बांधला आहे.

- या लेखात विष्णूच्या अवतारांची स्तुती व अनयचंद्राच्या आधीच्या राजांची प्रशस्ती व नंतरचा राजा आयुषचंद्र याची प्रशस्ती येते.

- निष्कर्ष असा निघतो की, बाबरी मशीद ही जुन्या मंदिरावर बांधली होती.



बाराव्या शतकात बांधलेले मंदिर पूर्वाभिमुखी होते
. राम हा सूर्यवंशी देव असल्याने त्याचे मंदिर सूर्य मंदिराप्रमाणे पूर्वाभिमुखी असणे योग्यच आहे. कदाचित उगवत्या सूर्याची किरणे गर्भगृहातील मूर्तीवर पडत असावीत. हे मंदिर भव्य होते. उंच शिखर असून त्याला सोन्याचा कळस होता. शरयू नदीच्या काठावर हे मंदिर होते. बाराव्या शतकातील मंदिर त्याहीपेक्षा जुन्या मंदिराच्या स्थानावर उभे होते. त्या आधी गुप्तोत्तर काळात एक गोलाकार मंदिर होते. इ. स. पूर्व दुसर्‍या सहस्रकापासून या ठिकाणी एक धार्मिक स्थळ होते. यावरून उत्खननातील पुराव्यांवरून निश्चितपणे हे लक्षात येते की, हिंदू भाविकांनी सातत्याने या ठिकाणी रामाची पूजा केली आहे.


- दीपाली पाटवदकर

 


(संदर्भ : मीनाक्षी जैन, बी. बी. लाल व के. के. मुहम्मद यांनी दिलेल्या मुलाखती.)

 

@@AUTHORINFO_V1@@