रथयात्रा आठवणींच्या चाकावरची

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    09-Nov-2019
Total Views |




ती रथयात्रा ऐतिहासिक ठरली. सगळ्यांनीच त्या यात्रेचे यश आणि परिणाम पाहिले. देशभरात एक विलक्षण विश्वासाचे वातावरण तयार केले या यात्रेने आणि स्वतःलासेक्युलरम्हणवणार्‍या काही बलाढ्य लोकांसाठी अवघड जागेचे दुखणे. या यात्रेतील प्रवासाच्याही आठवणी असंख्य आहेत. विशेष करून पुण्याच्या टप्प्यातील यात्रा. बाबांनी आमच्याबरोबर वेळ घालवायला मिळावा म्हणून आम्हाला बोलवून घेतले



रामजन्मभूमीचा निकाल आला. या निकालातून काय मिळालं? माझ्यासाठी सर्वप्रथम माझ्या बालपणीच्या माझ्या भाजप परिवाराच्या आठवणी ताज्या झाल्या. अगदीच कमी लोकं होतो, पण स्नेहबंध घट्ट होते. कारसेवेच्या वेळी मी फार तर आठ-नऊ वर्षांची असेन. पण, त्या वेळच्या चळवळीच्या भावनेला वयाचे निर्बंध नव्हते. सकारात्मकतेने निश्चयाने भारलेले वातावरण होते तेव्हा. कोणतीही भयावह नकारात्मकता नव्हती.


रथयात्रेचा विचार सुरू झाला पदयात्रेतून
. पण, बाबांनी भाजपच्या भविष्याचा विचार करत अडवाणीजींसमोर रथयात्रेची कल्पना मांडली. त्यावेळच्या तत्त्ववादी धुरिणांचा विरोध असतानाही जास्तीत जास्त जनतेसमोर आपले विचार पोहोचवण्यासाठी एका ट्रकचे एका दिमाखदार रथात रूपांतर करून त्या रथातून देशभर ही यात्रा करण्याची कल्पना. मी त्या बालवयात या योजनेचा भाग होते. कशी? माझा जन्म चेंबूरचा. या रथाची निर्मिती चेंबूरमध्येच करण्यात आली. आमच्या घरापासून थोड्याच अंतरावर. तिथे मी रोज जायचे. उद्देश एकच की, बाबांबरोबर वेळ घालवायला मिळेल. त्यांच्याशी खेळायला मिळेल. पण ते यात्रेच्या आखणीत इतके व्यस्त असत की वातावरण सतत गंभीर असे. (ज्यांना प्रमोदजींची परिपूर्णतेची कळकळ माहीत आहे त्यांना मी काय म्हणते आहे ते समजेल.) रोज तो रथ माझ्यासाठी खेळायची जागा असे आणि एका विलक्षण अभिमानाचीही. मला या विषयातली गहनता जरी समजत नव्हती, तरी एक विलक्षण सकारात्मकता त्या रथात कायम जाणवत राही.



ती रथयात्रा ऐतिहासिक ठरली
. सगळ्यांनीच त्या यात्रेचे यश आणि परिणाम पाहिले. देशभरात एक विलक्षण विश्वासाचे वातावरण तयार केले या यात्रेने आणि स्वतःला ‘सेक्युलर’ म्हणवणार्‍या काही बलाढ्य लोकांसाठी अवघड जागेचे दुखणे. या यात्रेतील प्रवासाच्याही आठवणी असंख्य आहेत. विशेष करून पुण्याच्या टप्प्यातील यात्रा. बाबांनी आमच्याबरोबर वेळ घालवायला मिळावा म्हणून आम्हाला बोलवून घेतले. पुण्याला जाताना आम्हाला अपघात झाला आणि आम्हाला अण्णा जोशी काकांच्या गाडीची वाट बघत बसावे लागले. या सगळ्या गडबडीत पुण्यात झालेल्या रथाच्या अतिभव्य स्वागत सोहळ्याला पोहोचायला आम्हाला उशीर लागला. जेव्हा बाबांनी आम्हाला पाहिलं तेव्हा त्यांनी मला व्यासपीठावर बोलवून घेतलं. आम्ही दोघे मागे बसलो आणि एकमेकांशी खेळायला लागलो. ज्यावेळी व्यासपीठावर अडवाणीजींना भाषणासाठी बोलावत होते, त्यावेळी अनपेक्षितरित्या श्रोत्यांमधून “प्रमोदजी, तुम्ही बोला” अशी मागणी सुरू झाली. बाबांना मी विचारलं की, “ते का बोलत नाहीत?” ते म्हणाले, “आज माझा बोलायचा नाही, तुझ्याशी खेळायचा दिवस आहे.” पण, श्रोत्यांचा मागणीचा आवाज वाढत गेला आणि बाबांचा नाईलाज झाला. त्यांनी उपस्थितांना भारावून टाकणारे भाषण केले. हिंदुत्व, राम मंदिराची मागणी का, या प्रश्नांवरचे त्यांचे मुद्देसूद सडेतोड विचार लोकांना मंत्रमुग्ध करून टाकणारे होते. माझ्यासाठी ते शिकायचे दिवस होते.



यात्रा पुढे उत्तर भारतात सुरू असताना मी परळीमध्ये माझ्या आत्या आणि आतेबहिणींकडे सुटीसाठी गेलेले होते
. अचानक बाबा आणि अडवाणीजींच्या अटकेची बातमी आम्हाला रेडिओवर ऐकायला मिळाली. लालूप्रसाद यादव यांचे नाव मी पहिल्यांदा त्यावेळी ऐकले. लालूप्रसाद यादव ही विश्वासाची यात्रा थांबवू पाहत होते. जनमानसात या अटकेमुळे प्रचंड रोष निर्माण झाला होता. पण, आमच्या घरात वातावरण वेगळेच होते. माझी आजी आणि आत्या या अटकेमुळे सैरभैर होऊन गेल्या होत्या. बाबांची आणीबाणीच्या वेळच्या दीड वर्षांच्या अटकेनंतरची ही दुसरी अटक होती. बाबांचे आता काय होणार, या भयाने त्या सगळ्या रडत होत्या. आजी तर ‘प्रभू रामा, आता तूच वाचव रे याला’ असा सतत धावा करत होती. यात्रा आणि यात्रेनंतरच्या घटना ऐतिहासिकच म्हणाव्या लागतील.



या आंदोलनाच्या वेळी विश्वास असलेले लोकही होते आणि विश्वास नसलेले लोकही
. बाजूने अथवा विरोधात, पण देशातल्या प्रत्येक नागरिकाचा या घटनेशी संबंध होताच. आजच्या निकालामुळे तर्क आणि विश्वास एकत्र राहू शकतात, हे सिद्ध केले आहे. आजच्या या संतुलित आणि सर्वांनाच समाधान देणार्‍या या निकालामुळे मला आनंद झाला आहे. हा बहुसंख्याक किंवा अल्पसंख्याकांचा विजय नाही. हा विश्वासाचा विजय आहे. जगाच्या इतिहासातली ही पहिल्यांदाच घडलेली घटना नाही. शेवटचीही अजिबात नाही. या संपूर्ण अध्यायातून राजकारण आणि त्याची वाटचाल शिकायला मिळेल. आपला देश एका विचाराने, एका ध्येयाने गुंफलेला आहे. ही वीण मजबूत आहे. हे सगळं घेऊनच आपल्याला पुढे जायचं आहे. आज आपला भारत जगाच्या नकाशात दिमाखाने झळकतोय. कारण, आपली सर्वसमावेशक विचारधारा आणि सक्षम कणखर नेतृत्व. ही गोष्ट कोणीही नाकारत नाही आणि भविष्यातही कोणालाही नाकारता येणार नाही.



या निकालाने भाजपच्याही इतिहासाचे एक पान पालटले आहे
. भाजपचा विचारधारेवरील विश्वास, पाहिलेली स्वप्ने, त्यासाठी केलेला संघर्ष या सगळ्यांचाच आज विजय होताना दिसतो आहे. मग तो आजचा निकाल असो, ‘कलम ३७०’ असो किंवा ‘समान नागरी कायदा’ असो. मला आठवतंय, भाजपच्या जाहीरनाम्यातील या मुद्द्यांबद्दल पत्रकारितेतील धुरिणी कायम प्रश्न उपस्थित करत असत. त्यावेळी धूसर वाटणारी ही सगळी स्वप्ने आज सत्यात उतरत आहेत, याचा आनंद निर्भेळ आहे. आता भाजपच्या इतिहासातील नवीन पर्व सुरू होत आहे. दृढ विश्वासाने आपली संस्कृती ते आपली अर्थव्यवस्था मजबूत बनवत आपल्याला जगाचं नेतृत्व करायचं आहे. त्यासाठी प्रत्येक भारतीयाने आपापल्या परीने योगदान द्यायला हवंया निकालाने भारताच्या गौरवशाली इतिहासात एक नवा अध्याय लिहिला आहे, जो येणार्‍या काळात युवकांना, उगवत्या नेतृत्वाला प्रेरणादायी ठरेल.

जय श्रीराम!


खासदार पूनम महाजन
(लेखिका भाजयुमोच्या राष्ट्रीय अध्यक्षा आहेत.)

@@AUTHORINFO_V1@@