व्रतस्थ चित्रकर्ती : ज्योत्स्ना कदम

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    08-Nov-2019
Total Views |




भारतीय चित्रकारांपैकी ज्यांनी रंगलेपनात अनेक प्रयोग करून, रंगाकारांद्वारे अनेक प्रकारच्या भाव-भावनांना अभिव्यक्त करण्यासाठी कागद वा कॅन्व्हासचा अचूकपणे उपयोग केला अशा काही निवडक चित्रकारांच्या यादीमध्ये ज्योत्स्ना कदम यांचे नाव समाविष्ट आहे.



चित्रशैली विविध प्रकारच्या आहेत
. त्यातील आत्मसात केल्या जाणार्या शैलीनुसार त्या त्या चित्रकाराची ओळख बनते. मूर्त-अमूर्त-अर्धमूर्त-आधुनिक-पारंपरिक याशिवाय स्थळ-काळ-वेळ यानुसार नामाभिधाने प्राप्त झालेल्या अनेक शैली आहेत, जशा ‘राजस्थानी शैली’, ‘कांग्रा शैली’, आपली ‘अजिंठा चित्रशैली’ वगैरे... ज्येष्ठ चित्रकार ज्योत्स्ना कदम यांच्या कलाकृती पाहताना मला खूप दिवसांपासून मनात घर करून बसलेला विचार यानिमित्ताने व्यक्त करावासा वाटतोय की, चित्रकारांमध्ये विशेषतः भारतीय चित्रकारांपैकी ज्यांनी रंगलेपनात अनेक प्रयोग करून, रंगाकारांद्वारे अनेक प्रकारच्या भाव-भावनांना अभिव्यक्त करण्यासाठी कागद वा कॅन्व्हासचा अचूकपणे उपयोग केला अशा काही निवडक चित्रकारांच्या यादीमध्ये ज्योत्स्ना कदम यांचे नाव समाविष्ट आहेत्यांच्या कलाकृती या अध्यात्माशी निगडित भासतात.अध्यात्म म्हणजे तासन्तास, महिनोन्महिने डोळे बंद करून पद्मासन घालून चिंतन करणे नव्हे. तर जी कृती केल्याने वा जी कृती करण्याने मनाला आनंद वाटेल, जी कृती सुखापेक्षा आत्मानंदाची अनुभूती देते तिला ‘अध्यात्म’ म्हणतात. हे मी नव्हे स्वामी विवेकानंदांपासून तर आचार्य रजनिश अर्थात ओशोंपर्यंत अनेक चिंतकांनी नमूद करून ठेवलेले आहे.



आपण भारतीय कलेचा इतिहास पाहिला
, तर पुरुषांच्या तुलनेने महिला चित्रकार म्हणजेच चित्रकर्ती फारच कमी आहेत. कारणे काहीही असतील, मात्र निरीक्षण नाकारता येणार नाही. त्यांच्या यादीत प्रयोगशील आणि वैचारिक बैठक असलेली चित्रकर्ती म्हणून ज्योत्स्ना कदम यांचे नाव घ्यावे लागेल. त्यांचा साहित्य वाचनाचा व्यासंग त्यांच्या विद्यार्थीदशेपासूनचा असल्याचे माझ्या वाचनात आले आहे. रंगाकारांना वाचनमूल्यांद्वारे प्राप्त प्रज्ञेची जोड मिळाली, तर तेथे फक्त भावाकारांना व्यक्त झालेले पाहायला मिळते. ज्ञानेश्वरीच्या निरुपणापासून तर के. वी. बेलसरे यांच्या आध्यात्मिक पुस्तकांपर्यंत आणि ज्योतिषशास्त्र, मानसशास्त्र तसेच सौंदर्यशास्त्रासह डॉ. यशवंत पाटील यांच्या ‘ब्रह्मगिरीची सावली’पर्यंत सारेच संदर्भ रंगाकारांच्या माध्यमातून कदम यांच्या कलाकृतींद्वारे पाहायला मिळतात. दि.५ ते ११ नोव्हेंबर या सप्ताहातील त्यांच्या कलाकृतीचे प्रदर्शन जहांगिर कला दालनात सुरू आहे. एका सुप्त, गूढ तरीही आनंददायक अशा कलाप्रवासाचा व्यक्त झालेला चित्रानुभव पाहण्याचा योग यानिमित्ताने आलेला आहे.निसर्गातील दृश्यकारांना चित्रकर्तीने स्वतःच्या नजरेने अंतःकरणपूर्वक टिपलेले आहे. एका व्रतस्थ चित्रकर्तीचा कलाप्रवास म्हणजे हे प्रदर्शन होय.



-प्रा. गजानन शेपाळ
@@AUTHORINFO_V1@@