भारतीय मुस्लीम भाग्यवान म्हणायचे

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    08-Nov-2019   
Total Views |





काहीही असले तरी पाकिस्तानी जनतेचे हाल आणि छळ संपता संपणार नाही, हे खरे आहे. नवनव्या समस्या आणि उद्भवणार्‍या हिंसेने पाकिस्तानी जनता पिचली आहे. त्या अनुषंगाने १९४७ साली भारतात राहण्याचा निर्णय घेणारे मुस्लीम भाग्यवान म्हणायचे.



फजलूर रहमान
, जमीयत उलेमा-ए-इस्लामचेनेता! सध्या पाकिस्तानमध्ये फजलूर यांच्या नेतृत्वाखाली आझादी मार्च सुरू आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान इमरान खान यांच्या विरोधात सगळे विरोधी पक्ष एकवटलेत आणि त्यांचे नेतृत्व करत आहेत फजलूर रहमान. या रहमान यांनी गेले कित्येक दिवस आझादी मोर्चा काढला आहे. त्यांच्या या मोर्चामध्ये २ लाखाहून अधिक पाकिस्तानी सामील झाले आहेत. या सगळ्यांचे प्रतिनिधी म्हणून फजलूर यांनी इमरान यांना राजीनामा द्यायला लावला आहे. फजलूर हे मौलवी आहेत म्हणे.



मौलवी म्हणजे धर्मगुरूबिरू असावेत पण भौतिकतेमध्ये त्यांचाही जीव अडकलेला दिसतोय
. कारण डिझेल विक्रीबाबत कमिशन घेतल्याचा त्यांच्यावर आरोप असल्याने त्यांना पाकिस्तानमध्ये मौलवी डिझेल ही नामावली प्राप्त झाली आहे. अर्थात पाकिस्तानमध्ये अराजकता माजली आहे. पाकिस्तानच्या राजकीय, आर्थिक आणि सामाजिक या सर्वांवर या बाबींचा परिणाम होणारच आहे. त्यात काही दुमत नाही. अर्थात विरोधी पक्ष एकवटला आहे, रस्त्यावर उतरला आहे, आणि तो पंतप्रधानांचा राजीनामा मागत आहेत म्हटल्यावर पाकिस्तानात वातावरण तापणारच. नव्हे तापलेच आहे. पण दुसर्‍या बाजूने पाहिले तर जाणवेल की हे काही पाकिस्तानसाठी नवे नाही. पंतप्रधानाला डोक्यावर चढवायचे, त्याने आपला जम बसवायचा प्रयत्न केला की लष्कर किंवा आणखी कसला तरी उठाव करत त्याच पंतप्रधानाला तख्तावरून खाली खेचायचे, हा पाकिस्तानचा त्याच्या जन्मापासूनचा शिरस्ता आहे. त्यामुळे फजलूर रहमान हे एक निमित्त आहे.



पाकिस्तान नेहमीच भारताला त्रास देत असतो
. (त्याच्या शक्तीनुसार, कारण भारत पाकिस्तानला पुरून उरतो) त्यामुळे पाकिस्तानमध्ये अशी अस्थिरता आली तर राजकीय दृष्टिकोनातून पाहिले असता त्याला वेगळे आयाम आहेत, पण पाकिस्तानमध्ये फजलूर रहमान यांच्या नेतृत्वाखाली इमरान सरकार कोसळणे आणि फजलूरचे समर्थनीय सरकार किंवा पंतप्रधान बनणे याच्या परिणामांचाही विचार करायला हवा. फजलूर यांची पार्श्वभूमी आहे की, ते कट्टर प्रतिगामी आहेत. तालिबानला उघड आणि कट्टर समर्थन देणारा मौलवी म्हणून त्यांची छबी कट्टर पंथीयांमध्ये तिथे लोकप्रिय. कारण कोणाही मुस्लीम कट्टर पंथीयांचे जे मत, जे विचार आहेत, तेच या मौलवींचे विचार. पाकिस्तानमध्ये सध्या मदरशांना मुख्य धारेत आणण्याचा प्रस्ताव आहे, तर या मौलवीची मागणी की, पाकिस्तानमधील मदरशांना मुख्य धारेत का आणायचे? मुख्य धारेत वगैरे नाही तर मदरशांना मुस्लीम धर्माच्या चौकटीतच राहू द्या. तिथे कट्टर मुस्लिमतेचा अभिनिवेश कायम असू द्या. तसेच आधीच सांगितल्याप्रमाणे मौलवीची वृत्ती तालिबानी असल्यामुळे धर्माच्या आणि अल्ला शरियत वगैरेंच्या नावावर महिला, धार्मिक अल्पसंख्याक यांच्या जगण्यावर नरकप्राय निर्बंध लादणे, हे मौलवीला अभिप्रेत असेल, यात शंका नाही.



तसेच सगळ्या गोष्टीचा संबंध भारताशी लावणे आणि भारताला शिव्याशाप देणे
, हे सुद्धा या मौलवीची नित्याची कामगिरी. पाकिस्तानमध्ये असंख्य प्रश्न आहेत. त्या प्रश्नाला बगल देणे, पाकिस्तानच्या सगळ्या अराजक परिस्थितीचे मूळ भारतच आहे, हे ठसवून पाकिस्तानी लोकांमध्ये भारतद्वेष वाढवणे, हा पाकिस्तानी नेत्यांचा एककलमी कार्यक्रम. हाच कार्यक्रम या मौलवीचाही आहे. त्यामुळे सर्वपक्षीय आझाद मोचार्र् काढताना त्याने इमरान खान यांच्यावर ठपका ठेवला आहे की, काश्मीर मुद्द्यावर इमरान खानने भारतापुढे कच खाली. इतकेच नव्हे तर मुस्लीम ब्रदरहूड असून ५ मुस्लीम राष्टे्रही काश्मीर मुद्द्यावर पाकिस्तानसोबत आली नाहीत. भारताला चोख उत्तर देणे गरजेचे होते, पण इमरान खानने दिले नाही.

सगळ्या जगाला माहिती आहे की, पाकिस्तानची कोणत्याही परिस्थितीमध्ये एवढी ताकद नाही की ते भारताशी सामना करतील. हे मौलवीला आणि त्याच्या सोबतच्या विरोधी पक्षाच्या नेत्यांनाही माहिती आहे. पण पाकिस्तानच्या भुकेकंगाल, कर्जबाजारी अराजक स्थितीवरून तेथील जनतेचे लक्ष हटवण्यासाठी हे असे करणे तेथील राजकारण्यांची मजबुरी असते. काहीही असले तरी पाकिस्तानी जनतेचे हाल आणि छळ संपता संपणार नाही, हे खरे आहे. नवनव्या समस्या आणि उद्भवणार्‍या हिंसेने पाकिस्तानी जनता पिचली आहे. त्या अनुषंगाने १९४७ साली भारतात राहण्याचा निर्णय घेणारे मुस्लीम भाग्यवान म्हणायचे.

@@AUTHORINFO_V1@@