‘स्मार्ट’ चोर आणि आपण

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    06-Nov-2019   
Total Views |




‘गुगल पे’ लिंकद्वारे बँक खातेधारकाच्या खात्यातील लाखो रुपये काही मिनिटांत वळते करण्याच्या या ‘स्मार्ट’ चोर्‍यांचा फटका गेल्या काही दिवसांत अनेकांना बसला आहे.


क्रेडिट आणि डेबिट कार्डधारकांची
‘ओटीपी’द्वारे होणारी फसवणूक आणि त्यांच्या शोधतपासाची प्रकरणे गेल्या काही चांगलीच काळात गाजली. दरम्यान, देश डिजिटल बनला. ‘पेटीएम’, ‘गुगल-पे’, ‘फोन-पे’, ‘युपीआय’ आदी अ‍ॅप्स काही वर्षांतच लोकप्रिय झाली. स्मार्टफोनच्या डिजिटल युगात ‘स्मार्ट पेमेंट’च्या या पद्धतीही तितक्याच गतीशिल झाल्या. पूर्वी एखाद्या खात्यात रक्कम भरण्यासाठी किंवा पाठवण्यासाठी लावावी लागणारी बँकेतील रांगही ओसरली. ‘गुगल-पे’सारख्या अ‍ॅपद्वारे क्षणात पैसे एका खात्यातून दुसर्‍या खात्यात वळते करण्याची सोय झाली. मात्र, हे वरदान आता शापही ठरू लागले आहे. ‘गुगल पे’ लिंकद्वारे बँक खातेधारकाच्या खात्यातील लाखो रुपये काही मिनिटांत वळते करण्याच्या या ‘स्मार्ट’ चोर्‍यांचा फटका गेल्या काही दिवसांत अनेकांना बसला आहे.


दिवाळीनिमित्त
‘गुगल-पे’द्वारे रांगोळी स्टिकर्स पाठवण्याची स्पर्धा घेण्यात आली होती. ज्याच्याकडे सर्व स्टिकर्स असतील, अशा भाग्यवान विजेत्याला २५१ रुपयांचे बक्षीस देण्याचे जाहीर करण्यात आले होते. मात्र, याच खेळादरम्यान अनेकांनी ‘गुगल-पे’द्वारे अनेकांची खाती रिकामी केल्याच्या तक्रारी मुंबईसह इतर पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आल्या आहेत. सायबर सुरक्षेचा मुद्दा वेगळा भाग म्हटला तरीही गुगलकडून अशा तक्रारींसाठी थेट असा कुठलाही मंच नाही. तसेच ऑनलाईन उपलब्ध असलेल्या काही क्रमांकावरूनच फसवणूक होत असल्याचे प्रकारही उघडकीस आले आहे.



मुंबईत एका नामांकित मोबाईल कंपनीत काम करणार्‍या एका उपव्यवस्थापकालाच सव्वा लाखांचा गंडा घालण्यात आला
. या उपव्यवस्थापकाने घरपोच वाईन पोहोचवणार्‍या दुकानाचा क्रमांक ‘गुगल’ केला. एका दुकानाचा क्रमांक त्यांना मिळाला. त्यानुसार त्यांनी फोन केला असता समोरून आगाऊ पैसे भरणा करण्याची मागणी करण्यात आली. त्यानुसार त्यांनी आपल्या क्रेडिट कार्डचा क्रमांक आणि ओटीपी देऊ केला. यावेळी त्यांच्या खात्यातून ३१ हजार, ७७७ रुपये वळते करण्यात आले. याचा मेसेज आल्यावर त्यांनी दुकानदाराला जाब विचारला. “हे पैसे तुमच्या खात्यात जमा होतील. चुकीने तसे ट्रान्झॅक्शन झाले आहे,” अशी बतावणी दुकानदाराने केली. असे करत दुकानदाराने आणखी एकदा ओटीपी मागवला. यावेळी मात्र, त्यांच्या खात्यातून ६१ हजार रुपये वळते करण्यात आले होते. गुगलवर रजिस्टर्ड होऊन बिझनेस किंवा अशा किरकोळ दुकानांची नावे ठेवून फसवणुकीचे प्रकार होतात, ही गोष्ट निराळीच. मात्र, ज्या ‘गुगल पे’ सारख्या अ‍ॅपवर विश्वास ठेवत आपण बँकेचे खाते जोडतो, त्याच खात्यातून एखाद्या लिंकमुळे आपले लाखोंचे नुकसान होऊ शकते‍ॅण्टॉप हिल येथे राहणार्‍या अमिताभ राजवंश यांना त्यांच्या क्रेडिट कार्डची मुदत संपल्याचे सांगणारा फोन आला होता. या सोबत त्यांना एक लिंक पाठविण्यात आली होती. त्यावर दोन रुपये पाठवण्यासाठी सांगण्यात आले. मात्र, तसे केल्यानंतर त्यांच्या खात्यातून चक्क ४० हजार रुपये वळते करण्यात आले. यानंतर त्यांनी आलेल्या फोनवर वारंवार फोन केले मात्र, फोन बंद येत होता. त्यानंतर त्यांनी गुगल पेला जोडण्यात आलेले बँक खाते बंद केले.



मुंबईतील अशाच एका गुगल
-पेच्या ग्राहकाला मोबाईल क्रमांक रिचार्ज करताना अनुभव आला. मोबाईल रिचार्ज न झाल्याने या ग्राहकाने गुगल-पे कस्टमर केअरला फोन केला. मात्र, या बनावट ‘गुगल-पे’ कस्टमर केअरने १० हजार रुपये सिक्युरिटी डिपॉझिट पाठविण्यास सांगितले. ही रक्कम ताबडतोब तुमच्या खात्यात पुन्हा येईल, अशी बतावणी त्यांना करण्यात आली. मात्र, या लिंकवर पैसे पाठवल्यानंतर चक्क ८० हजारांचा गंडा घातला गेल्याचे ‘गुगल पे’ ग्राहकाच्या लक्षात आले. हा सर्व प्रकार एकूणच अशा पेमेंट्स अ‍ॅपवरची विश्वासार्हता कमी होण्यासारखाच आहे. गुगलने आता यावर उपाय म्हणून फेस ऑथेंटिकेशन किंवा बायोमॅट्रिक्सचा पर्याय वापरण्याची सोय उपलब्ध केली आहे. भारतातही लवकरच ही सुविधा उपलब्ध होईल. ‘अ‍ॅण्ड्रॉईड-१०’ या व्हर्जनमध्येच ही सुविधा उपलब्ध आहे. तरीही ग्राहकांची गरज ओळखून त्या प्रकारच्या लिंकद्वारे पैसे उकळण्याचे वाढते प्रकार आता ‘स्मार्ट’ चोर करत आहेत, अशांना चाप लावण्यासाठी मोबाईलनुसार आपणही वेळीच स्मार्ट होण्याची गरज आहे.

@@AUTHORINFO_V1@@