नव्या सत्ता समीकरणांना सोनिया गांधींकडून वाटाण्याच्या अक्षता

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    05-Nov-2019
Total Views |
 

सोनिया गांधी शिवसेनेला पाठींबा देणार नाही ?

नवी दिल्ली : राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी कॉंग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांची दिल्लीत भेट घेतल्यानंतर राज्यातील सत्तेच्या नव्या समीकरणाबद्दल सोनिया गांधी अनुकूल नसल्याचे समजते. पवारांनी शिवसेनेसोबत जाऊन सरकार स्थापन करण्याबद्दलच्या शक्यतेला सोनिया गांधी यांनी तितकासा पाठींबा दिलेला नाही. कॉंग्रेसचे दिल्लीतील नेते शिवसेनेसोबत जाण्यासाठी अनुकूलता दर्शवत नसल्याची दिल्लीतील राजकीय वर्तूळात चर्चा आहे.

 

भाजप-शिवसेना महायुतीत लोकसभा निवडणूक लढवल्यानंतर अनेक राष्ट्रीय मुद्द्यांवर दिल्ली दरबारी दोन्ही पक्षांमध्ये टोकाचे मतभेद आहेत. महाराष्ट्रात शिवसेनेसोबत कॉंग्रेसने सरकार स्थापन केल्यास याचा फटका थेट दिल्लीत कॉंग्रेसला बसू शकतो, त्यामुळे सोनिया गांधी यांनी पवारांच्या भेटीत शिवसेनेसोबत जाण्यास अनुकूलता दर्शवलेली नाही.

 

यापूर्वी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी महाराष्ट्र कॉंग्रेसमधील इतर नेत्यांसह सोनिया गांधी यांची भेट घेतली होती. त्याभेटीतही सोनिया गांधी यांनी थेट शिवसेनेसोबत जाण्याबद्दल कोणतिही वाच्यता केली नव्हती. त्यामुळे भाजपने शिवसेनेला आणखी कोंडीत पकडले होते. दरम्यान, शरद पवार मंगळवारी दुपारी दोन वाजताच्या सुमारास दिल्लीतून मुंबईला रवाना होणार आहेत. त्यानंतर दुष्काळी भागाची पाहणी व महाराष्ट्रातील राष्ट्रवादी आणि कॉंग्रेसच्या नेत्यांशी चर्चा करून पुन्हा दिल्लीला सोनिया यांच्या भेटीसाठी जाणार आहेत. त्यामुळे तूर्त संजय राऊत यांच्या म्हणण्यानुसार नव्या समीकरणांच्या शक्यतेला दिल्ली कॉंग्रेसकडून वाटाण्याच्या अक्षता लावण्यात आल्या आहेत.




@@AUTHORINFO_V1@@