शेतकर्‍याचा मुलगा ते कोट्यधीश क्रिकेटपटू

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    05-Nov-2019
Total Views |





पंजाबमधील २० वर्षीय शुभमन गिल हा क्रिकेटपटू आज कोट्यवधींच्या घरात खेळत असला तरी इथपर्यंत पोहोचण्यासाठी त्याने फार मोठा संघर्ष केला आहे. त्याच्या संघर्षपूर्ण प्रवासाची कहाणी सांगणारा हा लेख...


क्रिकेटला भारतात फार मोठे प्रसिद्धीचे वलय प्राप्त असून या खेळातील भारतीय खेळाडूंची नावे आता सातासमुद्रापारही प्रसिद्ध आहेत
. भारतीय खेळाडूंच्या नावावर अनेक विक्रम असून त्यांचा एक वेगळाच दबबबा क्रिकेट विश्वात आहे. कसोटी, एकदिवसीय, टी-२० यांसह ‘अंडर-१९’, ‘वुमन्स क्रिकेट’ ‘दिव्यांग क्रिकेट’ अशा सर्व स्पर्धांमध्ये भारतीय खेळाडूंचा नेहमीच वरचष्मा राहिला आहे. म्हणूनच भारतीय संघाचे पारडे अनेकदा प्रतिस्पर्धी संघापेक्षा नेहमीच जड मानले जाते. अगदी १९८०च्या दशकांपासून ते आत्तापर्यंत अनेक भारतीय खेळाडूंनी क्रिकेट विश्वातील विविध विक्रम आपल्या नावावर कोरले आहेत. भारतीय खेळाडूंनी रचलेले विक्रम स्वदेशातीलच खेळाडूंनीच मोडण्याची परंपरा आपल्याकडे राहिली आहे. पंजाबमधील २० वर्षीय युवा खेळाडू शुभमन गिल याने भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली याच्या नावावर असलेला एक विक्रम मोडीत काढला आणि तो प्रकाशझोतात आला.



गिल याने सर्वात कमी वयाचा कर्णधार म्हणून कोहली याच्या नावावर असणारा विक्रम नुकताच मोडीत काढला
. देशांतर्गत चालणार्‍या रणजी सामन्यांमध्ये विसाव्या वर्षी संघाचे नेतृत्व करणारा शुभमन गिल हा आता प्रथम खेळाडू ठरला आहे. याआधी विराट कोहली याच्या नावावर हा विक्रम होता. कोहली याने ‘देवधर चषक’ क्रिकेट स्पर्धेत २००९-१०मध्ये ‘सर्वात युवा कर्णधार’ म्हणून संघाचे नेतृत्व केले होते. ‘देवधर चषका’तील ‘उत्तर’ विभागाच्या संघाचा कर्णधार म्हणून त्याने नेतृत्व केले होते. त्यावेळी कोहली याचे वय २० वर्षे आणि १४२ दिवस इतके होते. मात्र, यंदाच्या वर्षी देवधर चषकांतील सामन्यांदरम्यान शुभमन गिल भारताच्या ‘सी’ संघाचे नेतृत्व करत असून त्याचे वय २० वर्षे ५७ दिवस इतके आहे. त्यामुळे त्याच्या नावावर नव्या विक्रमाची नोंद झाली असून क्रिकेट विश्वात सध्या त्याची जोरदार चर्चा सुरू आहे. याशिवाय ‘अंडर-१९’ क्रिकेट विश्वचषकासह आंतरदेशीय सामन्यात कमी वयात उत्कृष्ट कामगिरी करण्याचे अनेक विक्रमही शुभमन गिलच्या नावावर आहेत. आज शुभमनचे नाव क्रिकेटप्रेमींच्या तोंडावर असले तरी त्याचा आजवरचा प्रवास हा संघर्षपूर्ण राहिला आहे.



शुभमनचा जन्म दि
. ८ सप्टेंबर, १९९९ मध्ये पंजाबमधील फिरोजपूर येथे झाला. शुभमनचे वडील लखविंदर गिल हे पारंपरिक शेतकरी. शुभमनच्या कुटुंबातील कोणत्याही सदस्याचा यापूर्वी क्रिकेटशी कधीच संबंध आला नाही. गिल कुटुंबीयांचा पारंपरिक व्यवसाय शेतीचा. शेतकर्‍याचा मुलगा असणारा शुभमन हा आंतरराष्ट्रीय स्तरावरचा एक खेळाडू बनेल, असा विचार गिल कुटुंबीयांपैकी कुणी स्वप्नातही केला नव्हता. मात्र, त्याला इथपर्यंत पोहोचविण्यासाठी त्याच्या वडिलांनी फार मोठे कष्ट उपसल्याचे शुभमन अनेकदा मुलाखतीदरम्यान सांगतो. “लहानपणी टीव्हीवर क्रिकेटचे सामने पाहिल्यानंतर मलाही दिग्गज खेळाडूंसारखे खेळावे, असे वाटायचे. मात्र, क्लबमध्ये जाऊन क्रिकेट खेळणे हे परिस्थितीच्या बाहेर असल्याने माझे वडीलच शेतीच्या व्यस्त वेळापत्रकातून क्रिकेट सरावाचे शुभमनला धडे देत.



अनेकदा शेतीच्या कामांमुळे त्यांना वेळ मिळत नसल्याने ते शेतीच्या कामासाठी येणार्‍या मजुरांना चेंडू टाकण्यास सांगून माझी क्रिकेट खेळण्याची इच्छा पूर्ण करत असत
,” असे शुभमन अभिमानाने सांगतो. लहानपणी शेतात क्रिकेट खेळल्यानंतर या खेळामध्ये आपल्याला फार रूची असून मला यामध्येच करिअर घडवायचे आहे, असे शुभमनने आपल्या वडिलांना सांगितले. क्रिकेटमध्ये करिअर घडविण्याची इच्छा असल्याने शुभमनला क्लबमध्ये क्रिकेट प्रशिक्षण मिळणे, गरजेचे आहे हे ओळखून त्यांनी आर्थिक तडजोड करण्यास सुरुवात केली. त्यांनी शुभमनला ‘पंजाब क्रिकेट असोसिएशनच्या क्लबमध्ये प्रवेश मिळवून देण्यासाठी फिरोजपूरहून फाजिल्का येथे स्थलांतर केले. फाजिल्का येथे भाड्याने घेतलेल्या एका लहानशा खोलीत वास्तव्य करत त्यांनी शुभमनला क्रिकेट प्रशिक्षणासाठी क्लबमध्ये प्रवेश मिळवून दिला. शुभमनचे क्लबमधील प्रशिक्षण सुरू झाले तरी गिल कुटुंबीयांना आर्थिक चणचण वारंवार जाणवतच होती. तरीही त्यांनी शुभमनचे प्रशिक्षण सुरूच ठेवले.



संघर्षाचा हा प्रवास सुरू असताना एके दिवशी
पंजाब क्रिकेट असोसिएशन’च्या पदाधिकार्‍यांची नजर १७ वर्षीय शुभमनवर पडली आणि येथूनच त्याच्या क्रिकेट करिअरला एक वेगळी कलाटणी मिळाली. पंजाब संघातून रणजी सामने खेळण्यासाठी त्याची नियुक्ती झाली. या सामन्यात त्याने उत्कृष्ट कामगिरी केल्यानंतर‘अंडर-१९’ विश्वचषक स्पर्धेसाठी त्याची निवड झाली आणि शुभमन हा सर्वत्र प्रकाशझोतात आला. यावेळी त्याने केलेली कामगिरी अनेक सामन्यांमध्ये निर्णायक ठरली. त्यानंतर आयपीएल सामन्यांसाठीही त्याची निवड झाली आणि अवघ्या विसाव्या वर्षी हा खेळाडू कोट्यधीश झाला. आजघडीला महत्त्वाचा खेळाडू म्हणून शुभमन ओळखला जात असला तरी आंतरराष्ट्रीय संघात स्थान मिळवण्यासाठी तो कसोशीने प्रयत्न करत असून पुढील वाटचालीसाठी त्याला दै. ‘मुंबई तरुण भारत’कडून शुभेच्छा...!


-रामचंद्र नाईक 
@@AUTHORINFO_V1@@